Metro News : मार्च महिन्यात 22 लाख 58 हजार जणांचा मेट्रोने प्रवास

एमपीसी न्यूज – मेट्रोच्या विस्तारित मार्गामुळे प्रवाशांच्या संख्येत वाढ होत ( Metro News) आहे. मार्च महिन्यात आजवरची सर्वाधिक प्रवासी संख्या नोंदवली गेली. एका महिन्यात 22 लाख 58 हजार 49 प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केला.

रुबी हॉल ते रामवाडी या विस्तारित मार्गाचे लोकार्पण नुकतेच झाले. त्यामुळे आता पीसीएमसी ते सिविल कोर्ट आणि वनाज ते रामवाडी या मार्गावर मेट्रो धावत आहे. मेट्रोच्या विस्तारित मार्गामुळे प्रवाशांची सोय होत आहे. तर त्याचा मेट्रोच्या उत्पन्नासाठी फायदा होत आहे. सिविल कोर्ट ते स्वारगेट हा मार्ग देखील लवकरच सुरू होणार आहे. दोन्ही मार्गांवर पूर्ण क्षमतेने मेट्रो सुरु झाल्यास मेट्रोच्या प्रवासी संख्येत आणखी वाढ होईल.

Maval LokSabha Elections 2024 :  मावळात पहिल्यांदाच ‘घड्याळ’ नसणार!

पीसीएमसी ते निगडी या मार्गाचेही भूमिपूजन करण्यात आले आहे. या मार्गावर मेट्रो सुरू झाल्यास पिंपरी चिंचवड करांचा मेट्रोला चांगला प्रतिसाद मिळेल. मेट्रोने प्रवाशांसाठी तिकिटाचे विविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचत आहे.

मार्च महिन्यात 22 लाख 58 हजार 49 जणांनी मेट्रोने प्रवास केला. त्यातून मेट्रोला 3 कोटी 50 लाख 85 हजार 484 रुपये उत्पन्न मिळाले आहे. ही आजवरची सर्वाधिक प्रवासी संख्या आहे. फेब्रुवारी महिन्यात 17 लाख 76 हजार 626 जणांनी मेट्रोने प्रवास केला ( Metro News)  होता.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.