Metro News : दोन्ही मार्गांवर आजपासून मेट्रोच्या दररोज 224 फेऱ्या

गर्दीच्या वेळी दर साडेसात मिनिटाला सुटणार मेट्रो

एमपीसी न्यूज – पुणे मेट्रोला प्रवाशांचा प्रतिसाद वाढत असल्याने मेट्रोने आपल्या ( Metro News)परिचालनात सुधारणा केली आहे. नियमित सुरु असलेल्या फेऱ्यांची वारंवारीता वाढवून दोन फेऱ्यांमधील वेळ कमी केला आहे. मेट्रोच्या प्रवाशांना 1 जानेवारी पासून सकाळी 8 ते 11 आणि सायंकाळी 4 ते 8 या गर्दीच्या वेळी दर साडेसात मिनिटाला मेट्रो उपलब्ध झाली आहे.

1 ऑगस्ट 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रोच्या गरवारे कॉलेज स्थानक ते रुबी हॉल क्लीनिक स्थानक आणि फुगेवाडी स्थानक ते सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक या मार्गाचे लोकार्पण झाले. या मार्गावर प्रवासी सेवेचा विस्तार झाला. पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते स्वारगेट (मार्गिका एक) आणि वनाझ ते रामवाडी (मार्गिका दोन) मिळून एकूण 24 किलोमीटर मार्गावर प्रवासी सेवा सुरु झाली आहे. उर्वरित 9 किलोमीटर मार्गाचे काम पूर्णत्वाकडे आले असून लवकरच पुणे मेट्रोची पहिल्या टप्प्यातील संपूर्ण मार्गिका प्रवाश्यांसाठी खुली करण्यात येणार आहे.

पुणे मेट्रोचा प्रवासासाठी होणारा वाढता वापर आणि नवीन वर्षानिमित्त पुणे मेट्रो आपल्या प्रवासी सेवेचा विस्तार करीत आहे. पुणे मेट्रोची सेवा सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत सुरु असते. यामध्ये सकाळी 6 ते सकाळी 8 या वेळेत मेट्रोच्या दर 15 मिनिटांप्रमाणे पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते स्वारगेट (मार्गिका एक) आणि वनाझ ते रामवाडी (मार्गिका दोन) दरम्यान 9 फेऱ्या, सकाळी 8 ते 11 या वेळेत दर 10 मिनिटांप्रमाणे पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते स्वारगेट (मार्गिका एक) दरम्यान 17 तर वनाझ ते रामवाडी (मार्गिका दोन) दरम्यान 18 फेऱ्या,

Koregaon Bhima : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विजयस्तंभास अभिवादन

सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत दर 15 मिनिटांप्रमाणे पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते स्वारगेट (मार्गिका एक) आणि वनाझ ते रामवाडी (मार्गिका दोन) दरम्यान प्रत्येकी 20 फेऱ्या, दुपारी 4 ते रात्री 8 या वेळेत पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते स्वारगेट (मार्गिका एक) आणि वनाझ ते रामवाडी (मार्गिका दोन) दरम्यान प्रत्येकी 25 फेऱ्या होत असत. रात्री 8 ते 10 या वेळेत दर 15 मिनिटांप्रमाणे पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते स्वारगेट (मार्गिका एक) दरम्यान 10 आणि वनाझ ते रामवाडी (मार्गिका दोन) दरम्यान 8 फेऱ्या होत असत.

प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेत नवीन वर्षानिमित्त पुणे मेट्रोने फेऱ्यांची वारंवारीता वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. 1 जानेवारी 2024 पासून मेट्रो दोन्ही मार्गिकांवर सकाळी 6 ते सकाळी 8 या वेळेत मेट्रो दर 10 मिनिटांच्या वारंवारतेनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते स्वारगेट (मार्गिका एक) आणि वनाझ ते रामवाडी (मार्गिका दोन) दरम्यान प्रत्येकी 12 फेऱ्या, सकाळी 8 ते 11 दर 7.5 मिनिटांच्या वारंवारतेनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते स्वारगेट (मार्गिका एक) आणि वनाझ ते रामवाडी (मार्गिका दोन) दरम्यान प्रत्येकी 24 फेऱ्या,

सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत दर 10 मिनिटांच्या वारंवारतेनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते स्वारगेट (मार्गिका एक) दरम्यान 32 आणि वनाझ ते रामवाडी (मार्गिका दोन) दरम्यान 30 फेऱ्या, दुपारी 4 ते रात्री 8 या वेळेत दर 7.5 मिनिटांच्या वारंवारतेनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते स्वारगेट (मार्गिका एक) आणि वनाझ ते रामवाडी (मार्गिका दोन) दरम्यान प्रत्येकी 32 फेऱ्या आणि रात्री 8 ते रात्री 10 या वेळेत दर 10 मिनिटांच्या वारंवारतेनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते स्वारगेट (मार्गिका एक) आणि वनाझ ते रामवाडी (मार्गिका दोन) दरम्यान प्रत्येकी 13 फेऱ्या प्रत्येक स्थानकावरून उपलब्ध होणार आहे.

https://twitter.com/metrorailpune/status/1741417260781342722?t=WbbzVvicSaJ4tQMhO_cZMw&s=19

यामुळे प्रवाशांच्या प्रतिक्षेचा कालावधी कमी होऊन त्यांच्या वेळेची बचत होण्यास मदत होईल. त्याच बरोबर मेट्रोची दिवसांमधील वारंवारता वाढणार आहे. आतापर्यंत पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते स्वारगेट (मार्गिका एक) या दरम्यान दिवसभरात 81 फेऱ्या होत असत. त्यात वाढ होऊन 1 जानेवारी 2024 पासून 113 फेऱ्या होणार आहेत. वनाझ ते रामवाडी (मार्गिका दोन) दरम्यान दिवसभरात 80 फेऱ्या होत असत त्यात वाढ होऊन 1 जानेवारी 2024 पासून 111 फेऱ्या सुरू झाल्या आहेत.

गर्दीच्या वेळेत पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते स्वारगेट (मार्गिका एक) आणि वनाझ ते रामवाडी (मार्गिका दोन) दरम्यान सहा मेट्रो ट्रेन कार्यान्वित होत्या. त्यात 1 जानेवारी पासून 8 मेट्रो ट्रेन कार्यान्वित झाली आहे. कमी गर्दीच्या कालावधीत 6 मेट्रो ट्रेन ( Metro News) धावतील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.