LokSabha Elections 2024 : जाहीर सभांसाठी पिंपरी-चिंचवड शहरातील 66 ठिकाणे निश्चित

एमपीसी न्यूज –  लोकसभा निवडणुकीसाठी पिंपरी-चिंचवड शहरातील 66 ठिकाणी (LokSabha Elections 2024)जाहीरसभा व कोपरासभा घेता येणार आहे. त्याशिवाय इतर ठिकाणी सभा घेता येणार नाही. ठरवून दिलेल्या जागेवर सभा घेण्यासाठी राजकीय पक्षांनी किंवा उमेदवारांनी अर्ज करावेत, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिकेने केले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात मावळ व शिरूर लोकसभा मतदारसंघाचा(LokSabha Elections 2024) भाग येतो. या दोन मतदारसंघातील उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी जाहीरसभा व कोपरासभा घेण्यासाठी महापालिकेने मैदान व मोकळ्या जागा निश्चित केल्या आहेत. त्या जागेत सभा घेता येणार आहे. त्यासाठी महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयाकडे रितसर अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

निगडी, अ क्षेत्रीय कार्यालय हद्द –  पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यामागील मोकळी जागा, आकुर्डी येथील खंडोबा मंदिराशेजारी जागा, आकुर्डीतील हनुमान क्रीडांगण, प्राधिकरण, निगडीतील संजय काळे क्रीडांगण, नियोजित महापौर निवासस्थानाची मोकळी जागा, मदनलाल धिंग्रा मैदान, शाहूनगर येथील राजषी शाहू महाराज मैदान अशी ठिकाणी आहेत.

रहाटणी, ड क्षेत्रीय कार्यालय हद्द – चिंचवडगाव येथील मोरया गोसावी मंदिराशेजारील मैदान, पिंपळे सौदागर येथील पालिका शाळेसमोरील शिवछत्रपती क्रीडा संकुल हे ठिकाणे आहेत.

भोसरी, ई क्षेत्रीय हद्द – भोसरी पीएमटी चौक, अंकुशराव लांडगे नाट्यगृहाजवळील चौक, लांडेवाडी चौक, भोसरी गावठाण बापुजी बुवा चौक, पीसीएमटी चौक, शीतल बाग चौक, दिघी रस्ता येथील गणपतराव फुगे विरगुंळा केंद्राजवळील चौक, भोसरीतील संत तुकारामनगर पाण्याच्या टाकीजवळील चौक, आळंदी रस्ता गव्हाणे पेट्रोल पंपाजवळील चौक, च-होली बैलगाडा घाट, च-होली फाटा, मोशी येथील शिवाजी महाराज महाराज पुतळा चौक, दिघी जुना जकातनाका चौक, डुडुळगाव, बोपखेल गावठाण, भोसरील तळ्याजवळील मैदान ही ठिकाणे आहेत.

कासारवाडी, ह क्षेत्रीय कार्यालय हद्द –  पिंपळे गुरव येथील काळूराम जगताप बॅडमिंटन हॉलशेजारील मोकळी जागा, कासारवाडी येथील सितांगण उद्यानासमोरील मोकळी जागा, संत तुकारामनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान, सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदान या ठिकाणांचा समावेश आहे. निगडीतील फ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत म्हेत्रे मैदान हे एकमेव ठिकाण आहे. चिंचवड येथील ब क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील चिंचवड गावातील गोयल गरिमा सोसायटीसमोरील मैदान आणि रावेत येथील डी मार्ट समोरील फुटबॉल मैदान अशी दोनच ठिकाणे आहेत.

क क्षेत्रीय कार्यालय हद्दीत सर्वाधिक ठिकाणे

राजकीय पक्षांना सभा घेण्यासाठी क क्षेत्रीय कार्यालय हद्दीत सर्वाधिक 34 ठिकाणे आहेत. चिखली बसथांबा, बोऱ्हाडेवाडी शाळेसमोरील मैदान, संजय गांधीनगर झोपडपट्टी समाज मंदिरासमोर, रामायण मैदान, रिव्हर रेसिडन्सीजवळील बाळाजी आल्हाट क्रीडांगण, राजे शिवाजीनगर येथील भाजी मंडई मैदान, देवकर वस्ती येथील श्रीकृष्ण मंदिर ही ठिकाणे आहेत.

तसेच, चक्रपाणी वसाहतील पूर्व कॉलनी, लांडगे वस्तीतील दत्तमंदिराजवळ, जयवंतनगर येथील संघर्ष कॉलनी, घावडेवस्ती येथील बाबा आनंद मंगल कार्यालयाजवळ, भगतवस्ती येथील गणेशमंदिराजवळ, सद्गुरूनगर येथील रानतारा कॉलनी चौक, गुळवे वस्तीतील श्रीकृष्ण कॉलनी, तिरूपती चौक, संतनगर चौक, स्पाईन मॉल चौक, इंद्रायणीनगर चौक, क्वॉलिटी सर्कल चौक, खंडे वस्ती चौक, आरटीओ चौक, सेवाधाम रुग्णालय चौक, इंद्रायणी मिनी मार्केट शेजारील मैदान ही ठिकाणे आहेत.

 

उद्यमनगर येथील रसरंग चौक, नेहरूनगर येथील संतोषी माता चौक, झिरो बॉईज चौक, मासुळकर कॉलनीतील स्केटिंग ग्राउंड, जाधववाडी येथील मैदान, सेक्टर क्रमांक 9 येथील बास्केटबॉल मैदान, सेक्टर क्रमांक 10 येथील हॉकीचे मैदान, नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियम आणि अजमेरा कॉलनी येथील डॉ. हेडगेवार क्रीडा संकुल ही ठिकाणे आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.