Pune: पुण्यातील प्राचीन विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात चोरी

एमपीसी न्यूज -पुण्यातील प्राचीन मंदिर असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात (Pune)चोरीचा प्रकार घडलाय. चोरट्यांनी मंदिरातील विठ्ठल रुक्मिणी गणपती आणि तुळजाभवानी मातेची प्राचीन मूर्ती चोरून नेली.

 

आठ मार्चच्या रात्री हा प्रकार घडला. विश्रामबाग पोलीस ठाण्यात या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. गौरव सिन्नरकर यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पुण्यातील टिळक रस्त्यावर (Pune)प्रसिद्ध असं खजिना विहीर विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे. अडीचशे वर्षे जुनी असलेल्या या मंदिरात प्राचीन मूर्ती देखील आहेत. आठ मार्चच्या रात्री तीन अज्ञात व्यक्ती मंदिर परिसरात आले. त्यांनी मंदिराचे कुलूप तोडून आज प्रवेश केला. त्यानंतर मंदिराच्या गाभाऱ्यात असलेल्या प्राचीन चांदीच्या मूर्ती चोरून नेल्या. यामध्ये विठ्ठल रुक्मिणी, गणपती आणि तुळजाभवानी मातेच्या मूर्तीचा समावेश आहे. याशिवाय या चोरट्यांनी मंदिरातील भिंतीवर असलेलं चांदीचे मखर देखील चोरून नेलं.

 

LokSabha Elections 2024 : जाहीर सभांसाठी पिंपरी-चिंचवड शहरातील 66 ठिकाणे निश्चित

दरम्यान चोरी झाल्याची माहिती मिळाल्यानंतर गौरव सिन्नरकर यांनी पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली. विश्रामबाग पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केलाय. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक फडतरे करत आहेत.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.