Wagholi : वाघोलीतील होर्डींग अपघात प्रकरणी होर्डींग मालकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – वाघोलीतील साई सत्यम पार्क परिसरात होर्डिंग( Wagholi ) कोसळले प्रकरणी नगररोड क्षेत्रीय कार्यालयाने होर्डिंग मालकाकडुन नोटीस द्वारे केवळ खुलासा मागविला आहे. तर नुकसान झालेल्या कार मालकानी पोलीसात तक्रार दिली आहे.

साई सत्यम पार्क परिसरात बुधवारी (दि.17) सांयकाळी झालेल्या पावसाने व वादळी वाऱ्याने पुणे नगर महामार्गावर होर्डिंग कोसळून तीन ते चार कारचे नुकसान झाले. यामुळे काही तास महामार्गावर वाहतूककोंडी झाली हेती.

Talegaon : निवृत्त पोलीस उपअधीक्षक सदानंद इनामदार यांचे निधन

सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवीत हानी झाली नाही. हे होर्डिंग अधिकृत होते. मात्र ते कमकुवत असल्याने कोसळले. या पाऊस व वाऱ्याने वाघोलीतअनेक ठिकाणचे अनाधिकृत प्लेक्स, कमानी, लोखंडी फलकही तुटले. यामध्ये काही वाहनांचे नुकसान झाले. होर्डिंग कोसळल्याचा प्रकार गंभीर आहे. वाघोलीत अनेक होर्डिंग्स आहे. त्यांचे त्वरित स्ट्रक्चरल ऑडीट करावे. अशी मागणी नागरीक करीत आहेत.

त्यातच अशा घटना घडत आहेत. तर पावसाळ्यात काय स्थिती निर्माण होईल. असा सवाल नागरिक करीत आहेत. होर्डिंग मालकाला नोटीस बजावून खुलासा मागविला आहे. त्याचा खुलासा आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल. असे नगररोड क्षेत्रीय अधिकारी सोमनाथ बनकर यांनी ( Wagholi ) सांगितले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.