Pune : पुण्यात एप्रिल महिन्यात मागील पाच वर्षातील सर्वाधीक तापमान, गुरुवारी काही भागात तापमान 43 अंशावर

एमपीसी न्यूज – पुण्यातील काही भागात गुरुवारी (दि.18) तापमान 41 ते 43 अंशापर्यंत गेले ( Pune ) होते.  पुण्यात एप्रिल महिन्यात मागील पाच वर्षातील सर्वाधीक तापमानाची नोंद करण्यात आली आहे.  पुणे शहर आणि उपनगरात यंदाच्या एप्रिल महिन्यांत मागील अकरा वर्षांतील उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे.

2019 मध्ये एप्रिल महिन्याच्या अखेरीस 27 एप्रिल रोजी एकदाच पारा 43 अंशांवर गेला होता. त्यानंतर यंदा एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सलग पाच-सहा दिवस उपनगरात पारा 43 अंशांच्या वर राहिला आहे. प्रामुख्याने वडगाव शेरी, कोरेगाव पार्क, लवळे, हडपसर आदी ठिकाणी पारा 43 अशांच्या वर गेल्याचे दिसून येत आहे. 2013 पासून 2023 पर्यंत पुण्यात एप्रिल महिन्याचे तापमान सरासरी 37 ते 40 अंश सेल्सिअस दरम्यान राहिले आहे.

Wagholi : वाघोलीतील होर्डींग अपघात प्रकरणी होर्डींग मालकावर गुन्हा दाखल

अवकाळी पावसाच्या हजेरीनंतर तापमानात घट होण्याचा अंदाज होता. पण, गुरुवारी पुन्हा हडपसर, वडगाव शेरी, कोरेगाव पार्क येथील पारा 43 अंशांच्या वर गेला होता. हडपसरमध्ये सर्वाधिक 43.5 , वडगाव शेरीत 43.1 , कोरेगाव पार्कमध्ये 43 , मगरपट्ट्यात 42.4  लवळेत 41.2, पाषाण, शिवाजीनगरमध्ये 41.0 एनडीएत 40.9 आणि हवेलीत 39.2 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली ( Pune ) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.