Chinchwad : दोन वाहन चोरांकडून चार वाहने जप्त

एमपीसी न्यूज – एका वाहन चोराला गुन्हे शाखा युनिट दोनने अटक केली ( Chinchwad ) असून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. दोघांकडून एक रिक्षा आणि तीन दुचाकी वाहने जप्त करण्यात आली आहे.

दिनेश मलकारी इंगळे (वय 28, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. दिनेश इंगळे याला पोलिसांनी त्याच्या घरातून सोमवारी (दि. 24) ताब्यात घेतले. चिंचवड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका वाहन चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना गुन्हे शाखा युनिट दोनला माहिती मिळाली की, ही वाहन चोरी वाल्हेकरवाडी येथे रहाणाऱ्या दिनेश इंगळे याने केली आहे. त्यानुसार त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने चिंचवड परिसरातून दोन दुचाकी चोरल्याचे कबूल केले.

Talegaon Dabhade : नूतन विद्या मंदिरच्या 1974 -75 च्या एसएससी बॅचच्या विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन उत्साहात

दुसऱ्या कारवाईमध्ये पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्याने सांगवी मधून एक रिक्षा आणि पिंपरी परिसरातून एक दुचाकी चोरल्याचे सांगितले. दोन्ही कारवायांमध्ये पोलिसांनी एक रिक्षा आणि तीन दुचाकी असा एकूण दोन लाख 25 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

ही कामगिरी पोलीस उप आयुक्त स्वप्न गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त पदमाकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, पोलीस उपनिरीक्षक गणेश माने, प्रमोद वेताळ, संतोष इंगळे, जयवंत राऊत, देवा राऊत, सागर अवसरे, शिवानंद स्वामी, केराप्पा माने, दिलीप चौधरी, आतिष कुडके, नामदेव कापसे, शिवाजी मुंढे, अजित सानप, उद्धव खेडकर यांच्या ( Chinchwad ) पथकाने केली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.