Talegaon Dabhade : नूतन विद्या मंदिरच्या 1974 -75 च्या एसएससी बॅचच्या विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन उत्साहात

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील पूर्वीची नूतन विद्या (Talegaon Dabhade ) मंदिर आजची ॲड पु.वा. परांजपे शाळेच्या सन 1974-75 वर्षीच्या एसएससी ग्रुपच्या विद्यार्थ्यांचे दुसरे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले. या बॅचचे विद्यार्थी वयाची साठी ओलांडलेले आहेत, तरीही आपल्या वर्गमित्रांसाठी, शाळेच्या आठवणी जपण्यासाठी आणि विशेष म्हणजे सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी वेळोवेळी एकत्र येत असतात. अनेकजण सामाजिक, राजकीय, सहकार,शैक्षणिक क्षेत्रात मोठमोठ्या पदांवर कार्यरत आहेत. स्नेहसंमेलनानिमित्त इतिहास संशोधक प्रा. डॉ. प्रमोद बोराडे यांचे ‘शिवकाळ आणि वर्तमानाची सांगड’ या  विषयावर व्याख्यान झाले.

 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा अंजलीराजे दाभाडे (सरकार) होत्या.यावेळी नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सहसचिव, शालेय समितीचे अध्यक्ष नंदकुमार शेलार,सन 1974-75 वर्षातील एसएससी ग्रुपचे विद्यार्थी पुणे पीपल्स बँकेचे संचालक बबनराव भेगडे,माजी नगराध्यक्ष ॲड रवींद्र दाभाडे, पुणे जिल्हा भाजपाचे सचिव अविनाश बवरे,सन  1974-75 वर्षाच्या एसएससी ग्रुपचे संस्थापक मनोहर दाभाडे, त्यावेळचे साठी पार केलेले विद्यार्थी- विद्यार्थिनी व कुटुंबातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भारतमातेचा खरा सुवर्णकाळ हा शिवशाहीचा कालखंड होता. अमीराच्या हवेलीत आणी गरिबाच्या झोपडीत देखील तेवढाच आनंद होता.असे प्रतिपादन इतिहास संशोधक प्रा.डॉ. प्रमोद बोराडे यांनी व्यक्त केले.सन 1974-75 वर्षाच्या एसएससी ग्रुपच्या व्दितीय स्नेहसंमेलन प्रसंगी शिवकाळ आणी वर्तमानाची सांगड या विषयावर बोराडे बोलत होते.

यावेळी बोराडे म्हणाले की, “इतिहासाच्या सखोल अभ्यासातून आपण दुरवरच्या भविष्याकडे पाहू शकतो.सामान्य जनांना,गोरगरीब रयतेला आणी तळागाळातील लोकांना हे स्वराज्य / राष्ट्र माझे आहे. असे वाटणे ही अगदी स्वाभाविक प्रक्रिया स्वराज्यात दिसून येते. तर इतिहास विसरणारी पिढी कधीही इतिहास निर्माण करू शकत नाही हे वास्तव नव्या पिढीने समजाऊन घेऊन आपली वाटचाल करत सुवर्ण भारताची स्वप्ने पहावी.असे बोराडे म्हणाले. प्रा. डॉ, प्रमोद बोराडे यांनी शिवकाळ आणी वर्तमानाची सांगड या विषयावरती व्याख्यान  करून सर्व उपस्थितांची मने जिंकली.

यावेळी मागील वर्षी ज्या विद्यार्थ्यांचे वाढदिवस झाले त्या सर्व विद्यार्थ्यांचा – विद्यार्थींनींचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

मागील वर्षी स्वर्गीय मुकुंद करंदीकर यांना कृत्रिम श्वासोश्वासाद्वारे वाचविण्याचा प्रयत्न करणारे योगाचार्य रघुनाथ नाईकरे व सुभद्रा नाईकरे यांचा तसेच सरस्वती देवीची उत्कृष्ट रांगोळी काढणाऱ्या कु.रूपाली जेव्हेरी यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे नियोजनासाठी सुरेश खांडवे,विनायक करंडे,गोरख बुट्टे, कुंडलिक भेगडे,प्रदीप जव्हेरी,प्रकाश पेंडके,सखाराम जगताप, प्रमोद भागडे, बाळासाहेब दाभाडे, सुलभा परळीकर,राजेंद्र सिंदकर आदींनी सहभाग नोंदवला होता.

कार्यक्रमात स्वागत ॲड रवींद्र दाभाडे, प्रास्ताविक बबनराव भेगडे यांनी केले. सूत्रसंचालन अविनाश बवरे यांनी केले. तर आभार (Talegaon Dabhade ) रघुनाथ नाईकरे यांनी मानले.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.