Dighi : धमकी देत महिलेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्याला अटक

एमपीसी न्यूज – महिलेला धमकी देत तिच्यावर (Dighi ) वेळोवेळी अत्याचार करणाऱ्याला दिघी पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार ऑगस्ट 2018 ते सप्टेंबर 2019 या कालावधीत दिघी येथील लॉजवर घडला आहे.

याप्रकरणी महिलेने सोमवारी (दि.24) फिर्याद दिली असून राहूल रामभाऊ लांडगे (वय 42 रा. बोपखेल) याला अटक केली आहे.

Sinhagad Express News : सिंहगड एक्सप्रेसमध्ये जागेवरून एकास बेदम मारहाण; सात प्रवाशांवर गुन्हा दाखल

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेला आरोपीने तू माझ्याशी चॅटींग करते हे नातेवाईकांना सांगेन अशी धमकी देत पीडिते सोबत जबरदस्ती शरीरिसंबंध ठेवले. तसेच तिचा अश्लिल  व्हिडीओ काढत  व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार आत्याचार केले. दरम्यान पीडितेला शिवीगाळ व मारहाण देखील कऱण्यात आली. यावरून दिघी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पोलीस पुढील तपास (Dighi ) करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.