Sinhagad Express News : सिंहगड एक्सप्रेसमध्ये जागेवरून एकास बेदम मारहाण; सात प्रवाशांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – पुणे-मुंबई सिंहगड एक्सप्रेस मध्ये जागेवरून (Sinhagad Express News ) प्रवाशांमध्ये वाद होण्याच्या  घटना वारंवार घडत आहेत. सोमवारी (दि. 24) पुन्हा वाद झाला असून जागेच्या कारणावरून सात जणांनी मिळून एका प्रवाशाला बेदम मारहाण केली आहे.

संदीप सिद्राम गोंदेगावे (वय 37, रा. वराळे, ता. मावळ) असे मारहाण झालेल्या प्रवाशाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी पुणे रेल्वे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सात अनोळखी प्रवाशांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Hinjawadi : पाण्याच्या टॅंकरच्या धडकेत एक महिलेचा मृत्यू तर तीन महिला जखमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संदीप हे सोमवारी सकाळी पुणे-मुंबई सिंहगड एक्सप्रेसने प्रवास करीत होते. लोणावळा स्टेशन वरून ते सिंहगड एक्सप्रेसमध्ये चढले. एका ठिकाणी जागा दिसल्याने त्यांनी रिकाम्या जागेवर बसण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तिथे असलेल्या सात प्रवाशांनी संदीप यांच्याशी वाद घातला. त्यांना हातापायाची बेदम मारहाण केली. यात संदीप यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली.

परतीचा प्रवास एसटीने

संदीप यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे उतरल्यानंतर रेल्वे पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी याबाबत लोणावळा रेल्वे पोलिसांकडे तक्रार देण्यास सांगितले. परतीचा प्रवास रेल्वेने करण्याऐवजी संदीप यांनी एसटी बसने पुणे गाठले. पुणे रेल्वे पोलीस तपास (Sinhagad Express News )करीतआहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.