Hinjawadi : पाण्याच्या टॅंकरच्या धडकेत एक महिलेचा मृत्यू तर तीन महिला जखमी

एमपीसी न्यूज – पाण्याच्या टँकरच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू झाला आहे (Hinjawadi ) तर तीन महिला जखमी झाल्या आहेत. ही घटना माणगाव येथील व्हिजे लेबर कॅम्प येथे सोमवारी (दि.24) सकाळी घडली.

याप्रकरणी महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून टँकरवर चालक नागेश तान्हाजी अहिवळे, लेबर सुपरवायजर समीर शेख, टाकीचे काम करणारा गुणवंत नथू राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Upsc News : युपीएससीच्या संयुक्त संरक्षण सेवा परीक्षेचा निकाल जाहीर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व तिची वहिनी या टाकीवर धुणी-भांडी करत होत्या. यावेळी टँकर चालकाने त्याच्या ताब्यातील टँकरने महिलेला धडक दिली तर यात फिर्यादी यांच्या वहिनीचा मृत्यू झाला तर एक महिला गंभीर जखमी झाली तर फिर्यादी व त्यांची बहीण गंभीर जखमी झाली आहे. यावरून हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास (Hinjawadi ) करत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.