Chinchwad : सोशल मिडीयावरची ओळख पडली महागात, महिलेची पावणे दोन लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – सोशल मिडीयावर ओळख वाढवून महिलेच्य़ा ( Chinchwad ) विश्वासाचा गैरफायदा घेत तब्बल पावणे दोन लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. हा प्रकार 14 एप्रिल रोजी चिंचवड येथे घडली आहे.

याप्रकऱणी महिलेने मंगळवारी (दि.20) पिंपरी पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला असून अज्ञात मोबाईल धारक व दोन महिला यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune : दगडूशेठ’ गणपती ट्रस्टतर्फे गणेशोत्सवात साकारण्यात येणार अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराची भव्य प्रतिकृती

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्याशी व्हॉटस अप व टेलिग्रामवरून ओळख वाढवून त्यांचा विश्वास संपादन केला. तसेच ऑनलाईन चॅटींग करत वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने 1 लाख 73 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली.

यावरून  पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत ( Chinchwad ) आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.