Chinchwad : सहायक पोलीस आयुक्त मुगुटलाल पाटील यांची तडकाफडकी बदली

एमपीसी न्यूज – देहूरोड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त मुगुटलाल पाटील यांची ( Chinchwad ) तडकाफडकी बदली करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या एका कारवाईमध्ये मुगुटलाल पाटील यांचे नाव आल्यानंतर लगेच ही बदली झाल्याची शहर पोलीस दलात चर्चा आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पुणे स्टेशन जवळ एका खासगी रुग्णालयाच्या पार्किंग मध्ये सापळा लाऊन एका वाहन चालकाला ताब्यात घेतले. त्याने देहूरोडचे सहायक पोलीस आयुक्त मुगुटलाल पाटील यांच्या सांगण्यावरून लाच घेतल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सांगण्यात आले होते.

Moshi : छत्रपती संभाजी महाराज, सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या पुतळ्यांच्या जागेत बदल

कात्रज-कोंढवा बायपास रोडवरील एका जागेसंबंधात फसवणुकीचा तक्रार अर्ज मुगुटलाल पाटील यांच्याकडे चौकशीसाठी आला होता. त्या तक्रार अर्जामध्ये तक्रारदार यांच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी व मदत करण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच मागण्यात आली आणि त्याच लाचेचा पहिला हप्ता म्हणून एक लाख रुपये घेण्यात आले असल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले होते.

हे प्रकरण समोर आल्यानंतर मुगुटलाल पाटील यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. त्यांच्यासह देहूरोड पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक वसंत देवकाते यांना नियंत्रण कक्षाशी संलग्न करण्यात आले आहे. तर पोलीस उपनिरीक्षक सोहम धोत्रे यांना निलंबित करण्यात आले ( Chinchwad ) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.