Moshi : छत्रपती संभाजी महाराज, सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या पुतळ्यांच्या जागेत बदल

एमपीसी न्यूज – महापालिकेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांचा भव्य पुतळा बोऱ्हाडेवाडी ( Moshi ) येथील विनायकनगर येथे उभारण्याचे काम सुरू हाेते. पायाचा चौथरा बांधण्यात आला असून 40 टक्के काम पूर्ण झाल्यानंतर आता पुतळ्याच्या जागेत बदल करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यामुळे चाैथरा उभारण्यासाठी केलेला पाच कोटींचा खर्च पाण्यात जाण्याची शक्यता आहे.

बोऱ्हाडेवाडी येथील विनायकनगर येथे 140 फूट उंच छत्रपती संभाजी महाराज तसेच, सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचा भव्य पुतळा उभारण्याचे नियोजन केले. त्याच्या चौथऱ्याच्या कामाची निविदा राबवून धनेश्वर कन्स्ट्रक्शन ठेकेदाराला सन 2020 मध्ये काम दिले. 12 कोटी 50 लाखांच्या या कामाची मुदत दीड वर्षे होती. वेळेत काम न झाल्याने ठेकेदाराला 31 डिसेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. आतापर्यंत 40 टक्के काम पूर्ण झाले आहे. छत्रपती संभाजी महाराज व सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचा पुतळा बनविण्याचे काम दिल्ली येथे प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार करीत आहेत.

Pune : पुण्यात तब्बल 4 कोटी रुपयांचे अमली पदार्थ पोलिसांनी केले जप्त

मात्र, आमदार महेश लांडगे यांनी विनायकनगर येथे पुतळा न उभारता तो पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) मोशी सेक्टर क्रमांक पाच व आठ येथील पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि कन्व्हेशन केंद्राच्या (पीआयईसीसी) ठिकाणी उभारण्याची मागणी महापालिकेकडे केली. तसेच प्रदर्शन केंद्राच्या जागेत पुतळा उभारण्यासाठी जागेची मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्यानुसार पीएमआरडीएने अडीच एकर जागा महापालिकेच्या ताब्यात दिली आहे. त्यामुळे त्या ठिकाणी पुतळा उभारण्यात येणार आहे. ‘क’ क्षेत्रीय कार्यालयाच्या स्थापत्य विभागाच्या छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याच्या स्थळ बदलाच्या प्रस्तावास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सर्वसाधारण सभेची मान्यता दिली आहे.

आयुक्त शेखर सिंह म्हणाले की, दर्शनी भागात छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी स्थळ बदलले आहे. मोशी आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र परिसरात हा पुतळा उभारण्यात येणार आहे. पुणे-नाशिक महामार्गावरून तो स्पष्टपणे दिसेल. जुन्या ठिकाणी चौथऱ्याचे काम झाले आहे. तो खर्च वाया जाणार नाही. त्याठिकाणी दुसरे काही तरी करण्यात ( Moshi ) येईल.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.