Thergaon : थेरगावमध्ये महिलेचा संशयास्पद मृत्यू; खुनाची शक्यता

एमपीसी न्यूज – थेरगाव येथे एका महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला. या प्रकरणात ( Thergaon) खुनाची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानुसार वाकड पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

 

मेघा लखन झुंडरे (वय 31, रा. आनंदवन सोसायटी, थेरगाव) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.

 

Chinchwad : सहायक पोलीस आयुक्त मुगुटलाल पाटील यांची तडकाफडकी बदली

 

याबाबत माहिती अशी की, मेघा झुंडरे यांना त्यांचे पती लखन यांनी रविवारी (दि. 18) सुरुवातीला न्यू थेरगाव हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल करण्यात आले.

 

उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मेघा यांना त्वचेचा आजार असल्याचे म्हटले जात आहे. मात्र या प्रकरणात घातपाताची शक्यता पोलीस तपासून पाहत आहेत. वाकड पोलीस तपास करीत ( Thergaon) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.