Chinchwad : शनिवारी पिंपरी चिंचवड बंदचे आवाहन

एमपीसी न्यूज – जालना येथील (Chinchwad) आंदोलकांवर झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्रभर ठिकठिकाणी बंद पाळला जात आहे त्याचाच भाग म्हणून शनिवारी दिनांक 9 पिंपरी चिंचवड शहरात बंदचे आवाहन करण्यात आले आहे.

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी उपोषणाला बसले आहेत. दरम्यान मागील आठवड्यात उपोषण स्थळी जमलेल्या कार्यकर्त्यांवर पोलिसांकडून लाठी हल्ला करण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्रभर निषेध आंदोलने केली जात आहेत. तसेच राज्यभरातील विविध शहरांमध्ये बंद देखील पाळला जात आहे.
बुधवारी (दि. 6) हिंजवडी, मारुंजी, माण आणि पंचक्रोशीत बंद पाळण्यात आला. त्या अगोदर मावळ आणि खेड तालुक्यात देखील बंद पाळण्यात आला. त्यानंतर आता शनिवारी (दि. 9) पिंपरी चिंचवड शहरात बंदचे आवाहन करण्यात आले (Chinchwad) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.