Pimpri : बेकायदेशीररित्या वृक्षतोड रोखण्यासाठी स्वतंत्र पथके

एमपीसी न्यूज – महापालिकेच्या वतीने वारंवार सूचना ( Pimpri ) देऊनही शहरातील विविध ठिकाणी बेकायदेशीररित्या वृक्षतोड केली जात आहे. या प्रकाराला आळा घालण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या उद्यान विभागाच्या वतीने स्वतंत्र पथके नेमण्यात येणार आहेत.  या पथकांद्वारे शहरातील विविध ठिकाणांची पाहणी करून बेकायदेशीररित्या वृक्षतोड करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती उद्यान विभागाचे उप आयुक्त रविकिरण घोडके यांनी दिली आहे.

शहरात विनापरवाना वृक्षतोडीच्या घटना वारंवार घडत आहेत. शहराच्या विविध भागात जाहिरात फलकांसाठी मोठ्या प्रमाणात वृक्ष तोड होत आहे असे महापालिकेच्या उद्यान व वृक्ष संवर्धन विभागाच्या निदर्शनास आले आहे. खाजगी तसेच महापालिकेची अखत्यारित असलेली झाडे विनापरवाना तोडली जात असून या वृक्षतोडीवर आळा घालण्यासाठी महापालिकेने कठोर पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे.

Pimpri : केंद्र सरकारने उज्ज्वला योजनेतून करोडोंची रक्कम लुटली – रवींद्र धंगेकर

पी. सी. एम. टी चौक भोसरी, देहू आळंदी  रोड, गवळी माथा येथील घनकचरा हस्तांरण प्रकल्पाच्या मागील बाजूस तसेच एमआयडीसी भोसरी येथील कटफास्ट कंपनी एफ-2  ब्लॉक वंडरकार शोरूम जवळ, जाधववाडी चिखली येथील साईराज पब्लिसीटी फॅशन दुकानासमोर, आकुर्डी येथील तुळजा भवानी मंदिरासमोर आणि डुडुळगाव रांजणगाव बेकायदेशीररित्या वृक्षतोड  वृक्षतोड करण्यात आली होती.

ही बाब महापालिकेच्या निदर्शनास येताच उद्यान व वृक्ष संवर्धन विभागाच्या वतीने संबंधित जाहिरात फलक मालकांवर महाराष्ट्र झाडे तोडणे अधिनियम 1964, कलम 3(1), महाराष्ट्र झाडे तोडणे अधिनियम 1964, कलम 4, महाराष्ट्र झाडे तोडणे अधिनियम 1975, कलम 21 (1) अंतर्गत फौजदारी गुन्हा दाखल करून दंडात्मक कारवाई करण्यात (Pimpri) आली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.