Alandi : आळंदी नगरपरिषदेत उमाजी नाईक यांची जयंती साजरी

एमपीसी न्यूज – आज दि.7 रोजी आळंदी नगरपरिषद (Alandi) कार्यालयामध्ये आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक  यांच्या जयंती निमित्त  त्यांच्या प्रतिमेस  पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक हे भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ब्रिटिशां विरुद्ध लढणारे महाराष्ट्रातील आद्यक्रांतिकारक आणि भारतीय स्वातंत्र लढ्यातील सशत्र क्रांतीचे प्रथम जनक होते. आळंदी नगरपरिषदेचे कार्यालयीन अधीक्षक किशोर तरकसे यांचे हस्ते आद्यक्रांतीवीर यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

या प्रसंगी  विभाग प्रमुख अर्जुन घोडे, विद्युत विभाग प्रमुख विष्णुकुमार शिवशरण, हनुमंत लोखंडे,  आरती गांधी, नाना घुंडरे, गणेश तळेकर, अजय वैरागे, सचिन तळेकर, हनुमंत चव्हाण, शहाजी चव्हाण, गोविंद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी आद्यक्रांतीकारी राजे उमाजी नाईक यांचे प्रतिमेस पुष्पांजली अर्पण केली.याबाबत माहिती आळंदी शिवसेना (शिंदे गट ) शहर प्रमुख राहूल चव्हाण यांनी (Alandi) दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.