Chinchwad : स्वतंत्र वीज उपकेंद्र उभारा, भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांची मागणी

एमपीसी न्यूज – चिंचवड विधानसभा मतदार संघात (Chinchwad) भेडसावणारी वीज समस्या कायमस्वरुपी सोडवण्यासाठी स्वंतत्र वीज उपकेंद्र उभारण्यात यावे, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी केली आहे.

याबाबत महावितरण पुणे परिमंडळाचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांना निवेदन पाठवले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहर झापाट्याने विकसित होत आहे. शहराच्या उपनगर भागात मोठ्या प्रमाणात नवीन व मोठे-मोठे गृहप्रकल्प, औद्योगिक वसाहती, आयटी कंपन्या उभ्या राहत आहेत. यामुळे या भागात विजेची मागणी मोठ्याप्रमाणात वाढली आहे.

सध्यस्थितीला वाकड, ताथवडे, पुनावळे या भागांमध्ये नवीन गृहप्रकल्प विकसित होत आहेत. यामुळे घरगुती जोडणी, व्यवसायिक जोडणी अशा अनेक नवीन ग्राहकांची संख्या वाढली आहे. मात्र, केवळ बिजलीनगर व रहाटणी या दोन ठिकाणी जीव उपकेंद्र आहेत.

Pune : म्हाडातर्फे 5 हजार 863 सदनिकांसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणीला सुरूवात

या दोन उपकेंद्रांवर संपूर्ण चिंचवड विधानसभा मतदार संघाचा (Chinchwad) वीजपुरवठा अवलंबून आहे. परिणामी, वीज पुरवठा यंत्रणेवर मोठा ताण येत असून, वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रमाण वाढले आहे.वाढती लोकसंख्या आणि वीजेची मागणी याचा विचार करुन महावितरण प्रशासनाने तात्काळ स्वतंत्र वीज उपकेंद्र उभारावे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.