Talegaon Dabhade : आदर्श व्यक्तिमत्त्व बनविणे हे मोठे आव्हान – डॉ. संभाजी मलघे

एमपीसी न्यूज – आदर्श व्यक्तिमत्त्व बनविणे हे विद्यार्थीदशेतील सर्वात मोठे आव्हान असते आणि हे आव्हान पेलण्याची ताकद केवळ शिक्षक देतात असे मत इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी व्यक्त केले. इंद्रायणी महाविद्यालयाच्या कला विभागाच्या वतीने आयोजित शिक्षक दिन समारंभात ते बोलत होते.

Chinchwad : स्वतंत्र वीज उपकेंद्र उभारा, भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांची मागणी

विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमास कला शाखेतील सर्व प्राध्यापक आणि कला शाखेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी शिक्षकांना भेटवस्तू देऊन सन्मानित केले.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, आदर्श व्यक्तीमत्व बनवत सुजाण नागरिक होण्यावर भर द्यावा असे आवाहन डॉ.मलघे यांनी विद्यार्थांना केले. तसेच इंद्रायणी विद्या मंदिर संस्था विविध पातळीवर प्रगती करित असताना विद्यार्थ्यांनी याचा फायदा घेऊन आपल्या आयुष्याला आकार द्यावा असे डॉ. मलघे म्हणाले.

याप्रसंगी विविध विद्यार्थ्यांनी आणि प्राध्यापकांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रीती यांबतनाल आणि सेजल लिमान या विद्यार्थीनींनी केले तर आभार अक्षय म्हस्के याने मानले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.