Talegaon Dabhade : ढवळलेल्या सामाजिक पार्श्वभूमीवर मलघे यांचे ‘बंधुतेचे झाड’ महत्त्वाचे – हेरंब कुलकर्णी

एमपीसी न्यूज – आज तीव्र होत असलेल्या जातीय अस्मिता आणि ढवळलेल्या सामाजिक ( Talegaon Dabhade) पार्श्वभूमीवर प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांचे ‘बंधुतेचे झाड’ हे पुस्तक महत्त्वाचे ठरते असे मत ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ आणि सामाजिक कार्तकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी व्यक्त केले. डॉ. संभाजी मलघे यांच्या ‘बंधुतेचे झाड’ या पुस्तकाचे प्रकाशन कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

पुण्यातील नामांकित पद्मगंधा प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. यावेळी सुप्रसिद्ध समाजसेवक डॉ. विनोद शहा, ज्येष्ठ साहित्यिक डॉ.सुनीलकुमार लवटे, महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष सचिन इटकर, प्रा.जे.पी.देसाई,चित्रकार श्रीधर अंभोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

आज संकुचित होणे सोपे झाले आहे आणि उदार होणे अवघड झाले आहे. सामाजिक आव्हाने मोठी होत आहेत. अशा परिस्थितीत बहुजनातून पुढे आलेला शिक्षित मध्यमवर्ग कुठे आहे असा प्रश्न पडतो. आणि या दिशाहीन समाजवास्तवाला योग्य रस्ता दाखविण्याचे काम प्राचार्य डॉ मलघे यांनी आपल्या पुस्तकातून केले आहे असे गौरवोद्गार हेरंब कुलकर्णी यांनी काढले.

Pune : पुण्यामध्ये बेकायदा शस्त्र विक्रीचं मोठे रॅकेट उघडकीस

 डॉ. मलघे यांनी या पुस्तकांमधून समाजामध्ये बंधुता प्रस्थापित करणाऱ्या विचारवंताविषयी ललित लेखन केले आहे. ही मराठी साहित्य आणि संस्कृतीमधील आदर्श पायवाट आहे. नव्या पिढीसाठी हा ठेवा आहे.

यावेळी बोलताना डॉ. सुनीलकुमार लवटे म्हणाले की, एका विपरीत काळात हे पुस्तक बाजारात येत आहे. या लिखाणातून स्वागतशीलता प्रतीत होते आहे. ही पुस्तके केवळ वाचण्याची पुस्तके नसून ती विचारांचा कृतिशील वस्तुपाठ असल्याचे मत डॉ. लवटे यांनी व्यक्त केले.

यावेळी. प्रा.जे.पी.देसाई,विनोद शहा,सचिन इटकर, श्रीधर अंभोरे, उद्धव कानडे आदी मान्यवरांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे प्रमुख डॉ.संदीप सांगळे यांनी केले तर आभार कवी उद्धव कानडे ( Talegaon Dabhade) यांनी मानले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.