Pune : पुण्यामध्ये बेकायदा शस्त्र विक्रीचं मोठे रॅकेट उघडकीस

एमपीसी न्यूज – बेकायदा शस्त्र विक्रीचं एक मोठे रॅकेट( Pune)  पुण्यामध्ये उघडकीस आले आहे. कोंढवा पोलिसांनी केलेल्या कारवाईत सात गावठी पिस्तूल हस्तगत करण्यात आले आहेत. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

संदेश उर्फ संजय अंकुश जाधव आणि शिवाजी उर्फ शिवा भाऊ कुडेकर अशी अटक करण्यात आलेली आरोपींची नावं असून दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.

Maharashtra : एसटी बसस्थानकांचा एमआयडीसीकडून होणार कायापालट

संदेश जाधववर आतापर्यंत वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये तब्बल 32 गुन्हे दाखल आहेत. ते दोघं बोपदेव घाटात शस्त्र विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून दोघांना जेरबंद केलं.

त्यांनी मध्य प्रदेशमधील उमरटी या ठिकाणाहून गावठी पिस्तूल विक्रीसाठी आणले होते. वीस हजार ते 40 हजार रुपयांना हे पिस्तूल विकलं जातं. पुण्यासारख्या शहरात इतक्या सहजतेने अवैध शस्त्रास्त्रांची खरेदी – विक्री होणं हे अतिशय गंभीर बाब ( Pune) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.