Talegaon Dabhade : जिद्दीच्या प्रवासावर स्वार व्हा – प्राचार्य डॉ. संभाजी मलघे

एमपीसी न्यूज – जिद्दीचा प्रवास (Talegaon Dabhade) माणसाला यशस्वी करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. जीवनात यशस्वी झालेल्यानी जिद्दीची कास सोडली नाही. त्या बळावरच माणूस आपले इप्सित ध्येय साध्य करू शकतो, असे मत इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी व्यक्त केले. इंद्रायणी महाविदयालयातील वरिष्ठ विज्ञान विभागाकडुन प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांकरीता स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

यावेळी विज्ञान शाखेतील विद्यार्थी व प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये प्रथम वर्ष विज्ञान विभागात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे द्वितीय आणि तृतीय वर्ष विज्ञान विभागातील विद्यार्थ्यांनी स्वागत केले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मलघे पुढे बोलताना त्यांनी त्यांचा जीवन प्रवास उलगडला. ”जिद्दीचा प्रवास माणसाला यशस्वी करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो.जीवनात यशस्वी झालेल्यांनी जिद्दीची कास सोडली नाही. त्या बळावरच माणूस आपले इप्सित ध्येय साध्य करू शकतो. प्राध्यापक हे नितांतपणे नावाड्याचे काम करत असतात. तुम्ही जिद्द नावाच्या नौकेत बसून स्वार व्हा. तुम्हाला यश मिळाल्या शिवाय राहणार नाही.” असे ते म्हणाले.

पुढे बोलताना प्राचार्य म्हणाले की, “आपली ओळख ही एकाकी निर्माण होत नसते, तिला अनेक वर्षांच्या परिश्रमाची झालर असते. त्या फळावरच मानसन्मान नावलौकिक मिळत असतो.” प्राचार्यांनी यावेळी आपला प्रेरणादायी जीवन प्रवास उलगडून दाखवला. ‘गुराखी ते प्राचार्य’ या आपल्या प्रवासातील महत्त्वाचे टप्पे, शैक्षणिक घडामोडी, नोकरीच्या संधी, वाड:मयीन कार्य, आपल्याला कसे निर्माण करता आले (Talegaon Dabhade) याविषयी माहिती दिली. त्याचबरोबर इतर कवींच्या कविता समर्पकपणे सादर करून विद्यार्थ्यांमध्ये चैतन्य निर्माण केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभाग प्रमुख रोहित नागलगाव यानी केले व प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांचे इंद्रायणी परिवारात स्वागत केले.

यावेळी उपस्थित प्राध्यापकांनी आपला परिचय करून देत, आपण शिकवत असलेल्या विषयाबद्दल सखोल माहिती दिली. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचीही मनोगते झाली.

Maval : मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्ष पदी सुनील दाभाडे यांची निवड

सांस्कृतिक कार्यक्रमाने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी सूत्रसंचालन द्वितीय वर्षातील विद्यार्थी सेजल गाडे व सम्राट रोकडे यांनी केले. तसेच आभार संजीवनी गायकवाड हिने मानले. या कार्यक्रमाचे समन्वयक म्हणुन प्राध्यापिका ऐश्वर्या शेवकर यानी काम पाहिले. इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे व कार्यवाह चंद्रकांत शेटे यानी विद्यार्थ्याना शुभेच्छा दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.