Maval : मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्ष पदी सुनील दाभाडे यांची निवड

एमपीसी न्यूज  : मावळ (Maval) तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्ष पदी सुनील तानाजी दाभाडे यांची निवड करण्यात आली आहे. त्यांनी यापूर्वी मावळ तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी निवड जाहीर केली.

पुणे येथील पक्ष कार्यालयात शनिवार (दि 9) पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नियुक्तीपत्र वाटप आणि कार्यकर्ता मेळाव्याच्या कार्यक्रमात त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर,मावळ तालुका राष्ट्रवादीचे माजी अध्यक्ष बबनराव भेगडे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुभाष जाधव, माजी नगराध्यक्ष सुरेश धोत्रे,पुणे जिल्हा युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष सचिन घोटकुले,पीएमआरडीएचे सदस्य व माजी नगरसेवक संतोष भेगडे, पुणे जिल्हा राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष संतोष मु-हेसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दाभाडे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

आपली राष्ट्रवादी कॉंग्रेसशी सअसलेली सामाजिक बांधिलकी आणि आतापर्यंत आपण सामाजिक व राजकीय क्षेत्रात केलेल्या प्रामाणिक कामाची नोंद घेऊन आपली राष्ट्रवादी मावळ तालुका कार्याध्यक्ष पदावर निवड करण्यात येत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी नियुक्तीपत्रात म्हटले आहे.

Hadapsar : चौथ्या मजल्यावरून लोखंडी सळई थेट डोक्यात घुसली; तरुणाचा मृत्यू

नवनिर्वाचित कार्याध्यक्ष (Maval) सुनिल दाभाडे यांनी अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निष्ठेने काम केले असून त्यांच्या निष्ठेचे आज फलित झाले. यापूर्वी त्यांनी राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्षपदाची धुराही यशस्वीपणे सांभाळली आहे. मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष असलेले सुनिल दाभाडे हे उत्कृष्ट संघटक म्हणून ओळखले जातात. माळवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणूनही त्यांची कारकीर्द उठावदार झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.