Hadapsar : चौथ्या मजल्यावरून लोखंडी सळई थेट डोक्यात घुसली; तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज : नव्याने सुरू (Hadapsar) असणाऱ्या इमारतीच्या बांधकाम साइटवर काम करत असताना चौथ्या मजल्यावरून पडलेली लोखंडी सगळी थेट डोक्यात घुसल्याने 29 वर्षे कामगाराचा मृत्यू झाला. हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मांजरी बुद्रुक परिसरात 28 ऑगस्ट रोजी ही घटना घडली. आरोपी ठेकेदारा विरोधात याप्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विठ्ठल गडदे (वय 29) असे मृत्युमुखी पडलेल्या कामगाराचे नाव आहे. ठेकेदार अशोक किसन शिंदे (वय 55, काळेपडळ हडपसर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ठेकेदाराचे नाव आहे. मयत तरुणाची पत्नी वर्षा विठ्ठल गडदे यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, विठ्ठल गडदे हे (Hadapsar) मांजरी रेल्वे गेट परिसरातील मांजराई व्हिलेज या साइटवर कामगार होते. 28 ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास काम करत असताना चौथ्या मजल्यावर ठेवलेली लोखंडी सळी फिर्यादी यांच्या पतीच्या डोक्यात पडली. यामध्ये गंभीर दुखापत झाल्याने अशोक गडदे यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.