Khadaki Crime : ‘गाडी अडवली हत्यार काढले आणि…’, वाचा खडकीत काय घडले

एमपीसी न्यूज : रात्रीच्या सुमारास दुचाकीने (Khadaki Crime) घरी निघालेल्या एका तरुणाची भर रस्त्यात दुचाकी अडवली. त्यानंतर धारदार शस्त्र काढून या तरुणाच्या गळ्याला लावलं. तुझ्याजवळ जे काही असेल ते काढून दे असं म्हणत या तरुणाजवळील 22 हजार रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने चोरून नेला.

हा संपूर्ण प्रकार घडला खडकी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सह्याद्री हॉस्पिटल समोर. स्वप्निल साहेबराव कांबळे या तरुणाने पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी इसमानविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी हे 18 जुलै च्या रात्री सह्याद्री हॉस्पिटल समोरील रस्त्याने जात होते. यावेळी दोन अनोळखी व्यक्तींनी दुचाकीवरून येत गाडी आडवी लावली आणि तुम्ही माझी गाडी का थांबवली असे विचारत धारदार हत्यार काढले.

Talegaon Dabhade : जिद्दीच्या प्रवासावर स्वार व्हा – प्राचार्य डॉ. संभाजी मलघे

त्यानंतर हेच हत्या या (Khadaki Crime ) तरुणाच्या गळ्याला लावत तुझ्याजवळ जे काही सामान आहे ते आम्हाला काढून दे नाहीतर तुला जिवंत सोडणार नाही असे म्हणत फिर्यादीचा 22 हजार रुपये किमतीचा मोबाईल जबरदस्तीने काढून घेतला. खडकी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.