Pune Crime : केस कापण्यासाठी पैसे न दिल्याने पत्नीला आणि मुलीला पट्ट्याने मारहाण

एमपीसी न्यूज : पतीने पत्नीकडे केस (Pune Crime ) कापण्यासाठी पैसे मागितले. मात्र पत्नीने पैसे देण्यास नकार दिल्याने चिडलेल्या पतीने पत्नीला कमरेच्या पट्ट्याने बेदम मारहाण केली. उत्तम नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली. याप्रकरणी 47 वर्षीय पत्नीने तक्रार दिली आहे. त्यानुसार 56 वर्षीय पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, आरोपी आणि फिर्यादी हे पती-पत्नी आहेत. आरोपी पतीने शनिवारी फिर्यादीकडे केस कापण्यासाठी पैसे मागितले होते. मात्र पत्नीने पैसे देण्यासाठी नकार दिला होता.

Khadaki Crime : ‘गाडी अडवली हत्यार काढले आणि…’, वाचा खडकीत काय घडले

त्यामुळे चिडलेल्या पतीने पत्नीला वाईट वाईट (Pune Crime) शिवीगाळ करत तुझ्याकडे बघून घेतो म्हणत धमकी दिली. त्यानंतर कमरेच्या पट्ट्याने पत्नीला बेदम मारहाण केली. फिर्यादीची 17 वर्षीय मुलगी मध्यस्थी करण्यासाठी आली असता आरोपींनी तिला देखील हाताने आणि पट्ट्याने मारहाण केली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.