Khadaki: फिनलंड मधील नोकरीच्या आमिषाने नागरिकाची 17 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – युरोपमध्ये नोकरीचे आमिष दाखवून एका व्यक्तीची 17 लाख(Khadaki) रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली. या प्रकरणी खडकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत रेंज हिल्स परिसरातील एका व्यक्तीने (वय 58) खडकी पोलिस ठाण्यात (Khadaki)फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर चोरट्यांनी फिर्यादीला मोबाईलवर संदेश पाठविला. फिर्यादीला युरोपमधील फिनलंड देशात नोकरीची संधी असल्याचे आमिष दाखवले. चोरट्यांनी त्यांना इ-मेलवर बनावट कागदपत्रे पाठवून विश्वास संपादन केला.

नोकरीसाठी कागदपत्रांची पूर्तता करण्याच्या बहाण्याने त्यांच्याकडून 16 लाख 80 हजार रुपये घेतले. त्यानंतर चोरट्यांनी पैसे परत न करता त्यांचे मोबाईल बंद करून ठेवले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.