Ravet : धुलिवंदना निमित्त ‘रंगात रंगुनी साऱ्या’ या विनोदी आणि विडंबनात्मक काव्यमैफलीत लुटला कवितांचा रंग

एमपीसी न्यूज : होलिकोत्सव आणि धूलिवंदनाचे औचित्य (Ravet) साधून नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळ – प्राधिकरण आणि तीर्थस्वरूप ज्येष्ठ नागरिक संघ – रावेत यांच्या संयुक्त विद्यमाने ‘रंगात रंगुनी साऱ्या’ या विनोदी आणि विडंबनात्मक काव्यमैफलीचे आयोजन करण्यात आले होते.

सामाजिक कार्यकर्ते मोरेश्वर भोंडवे, नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळाचे अध्यक्ष राज अहेरराव, सचिव माधुरी ओक, तीर्थस्वरूप नागरिक संघाचे अध्यक्ष अरविंद देशमुख, उपाध्यक्ष दिलीप शिंदे, सचिव शिरीष कुंभार आदी मान्यवरांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. तीर्थस्वरूप ज्येष्ठ नागरिक संघ – रावेत यांच्या पिंपरी चिंचवड शहरातील चाळीस साहित्यिकांच्या लेखनाचा समावेश असलेल्या ‘जीवनसंध्या – 2024’ या स्मरणिकेचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. यावेळी कृत्रिम रंगाचा वापर टाळून उपस्थितांवर रंगीबेरंगी फुलांची उधळण करून पर्यावरण पुरक धुलिवंदनाचा उत्सव साजरा करण्यात आला.

LokSabha Elections 2024 : कामगार, अधिकारी, कर्मचाऱ्यांना मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी

नवयुगचे उपाध्यक्ष राजेंद्र घावटे यांनी प्रास्ताविकातून मंडळाच्या 32 वर्षांच्या कार्यकाळातील विविध उपक्रमांची माहिती दिली.

‘रंगात रंगुनी साऱ्या…’ या काव्यमैफलीत बाबू डिसोजा, सुनंदा शिंगनाथ, आनंद मुळूक, राजश्री मराठे, सुप्रिया लिमये, राजेंद्र पगारे, सुहास घुमरे, दिलीप क्षीरसागर, अण्णा जोगदंड, योगिता कोठेकर, शोभा जोशी, रघुनाथ पाटील, माधुरी डिसोझा, (Ravet) अरुण कांबळे, प्रल्हाद दुधाळ, अतुल क्षीरसागर, प्रतिमा काळे, आदींनी विनोदी आणि विडंबनात्मक कवितांचे सादरीकरण करीत हास्यरसाचा परिपोष केला.

‘जीवनसंध्या – 2024’ मधील लेखनाप्रीत्यर्थ रजनी अहेरराव, माधुरी विधाटे, सीमा गांधी, प्रज्ञा घोडके, प्रदीप पाटील, रमेश वाकनीस, सुभाष चव्हाण, वंदना इन्नानी, नेहा कुलकर्णी, नंदकुमार मुरडे, गांधलीकर, पल्लवी चांदोरकर , बाबू डिसोजा या साहित्यिकांचा सन्मान करण्यात आला. अश्विनी कुलकर्णी, शरद काणेकर, अनिकेत गुहे, अरविंद वाडकर, चंद्रकांत कुलकर्णी, रमेश माने, नंदकिशोर बडगुजर यांनी संयोजनात सहकार्य केले. प्रा. संपत शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. पी.बी शिंदे यांनी आभार प्रदर्शन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.