Ravet : इस्कॉन मंदिरात वर्धापन दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

एमपीसी न्यूज – रावेत (Ravet) येथील इस्कॉन श्री गोविंद धाम मंदिराचा बुधवारी (दि. 27) 13 वा वर्धापन दिन साजरा होणार आहे. त्यानिमित्त मंदिरात दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजता या कार्यक्रमाची सुरुवात होईल. भजन, कीर्तन, श्री राधा कृष्णांचा अभिषेक, महाआरती आणि महाप्रसाद असे कार्यक्रम होणार आहेत. तेराव्या वर्धापन दिनानिमित्त मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली आहे.

Tathwade: गॅसचा काळाबाजार केल्याप्रकरणी तरुणाला अटक  

अनेक भाविक मागील दोन दिवसांपासून (Ravet) वर्धापन दिन उत्सवासाठी सेवा करत आहेत. मंगळवारी (दि. 26) सायंकाळी पालखी उत्सव साजरा झाला. बुधवारी दिवसभर श्रीकृष्णाचे दर्शन घेता येईल. भाविकांनी वर्धापन दिन सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.