Tathwade: गॅसचा काळाबाजार केल्याप्रकरणी तरुणाला अटक  

एमपीसी न्यूज –  विनापरवाना व विना सुरक्षा गॅस ट्रान्सफर केल्या प्रकरणी(Tathwade) वाकड पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे., ही कारवाई  रविवारी (दि.24) ताथवडे येथे करण्यात आली.

ब्रम्हाजी गुंडेराव हुलसुरे (वय 25 रा. ताथवडे) याला अटक केली असून (Tathwade)पोलीस शिपाई सौदागर लामतुरे यांनी वाकड पोलीस ठाण्यात पिर्याद दिली आहे.

 

Hinjawadi: भांडणे सोडवण्याचा प्रयत्न केला म्हणून तरुणाला बेदम मारहाण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी याने कोणत्याही  परवानगी शिवाय व सुरक्षा व्यवस्थेशिवाय घरगुती सिलेंडरची साठवणूक करून तो इतर छोट्या गॅस टाकीमध्ये ट्रान्सफर करत होता. यावरून पोलिसांनी छापा टाकून आरोपीला अटक केली. यावेळी त्याच्याकडून पोलिसांनी 31 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपीवर वाकड पोलिसांनी जिवनाश्यक वस्तू कायदा 1955 कलम 3,7 सह स्फोटक पदार्थ अधिनियम 1908 चे कलम 5 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.