Ravet : किराणा दुकानाला लागलेल्या आगीत तीन दुकाने जळून खाक

एमपीसी न्यूज – रावेत येथे एका किराणा मालाच्या दुकानाला आग लागली. ही आग ( Ravet ) शेजारच्या दोन दुकानांमध्ये पसरून तीन दुकाने जळून खाक झाली आहेत. ही घटना बुधवारी (दि. 17) पहाटे पावणे तीन वाजता एस. बी. पाटील रोड, आदित्य विवाज हाउसिंग सोसायटी समोर, रावेत येथे घडली.

 

बुधवारी पहाटे अंकुश माने यांनी अग्निशमन विभागाला रावेत येथे आग लागल्याची माहिती दिली. त्यानुसार प्राधिकरण, थेरगाव आणि पिंपरी मुख्य अग्निशमन केंद्र अशी तीन वाहने रावेत येथे दाखल झाली. साई सावली फ्रेश मार्ट या ठिकाणी आग लागली होती. ती आग आजूबाजूच्या दोन दुकानांमध्ये पसरली होती. वीजपुरवठा खंडित केल्याची खात्री करून जवानांनी पाणी मारून आग विझावली. सुदैवाने या आगीत कोणीही जखमी नाही.

 

अंकुश व्यंकटराव माने यांचे साई सावली फ्रेश मार्ट दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. दुकानातील किराणा, भाजी, फळे, स्टेशनरी वस्तू, तीन फ्रिज, इन्वर्टर, सीसीटीव्ही संपूर्ण सेट, फर्निचर, इलेक्ट्रिक वायर्स जळल्याने सुमारे 12 ते 13 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

Wakad : फिनिक्स मॉल ऑफ मिलेनियम येथे आग लागते तेव्हा…

 

विश्वनाथ पांडुरंग शेवाळे यांचे हॉटेल सुरेखा मधील किराणा, फर्निचर, इलेक्ट्रिक वायर्स, कपडे, दोन फ्रिज, धान्य, वॉशिंग मशीन, ओवन मशीन, खुर्ची, टेबल, दुकानातील सर्व साहित्य, दोन एलपीजी सिलेंडर आगीत भस्म झाले. यात सुमारे नऊ ते दहा लाखांचे नुकसान झाले आहे.

 

श्रावण निवृत्ती संगमे यांचे ओमसाई ऑटो गॅरेज मधील सहा दुचाकी वाहने, गॅरेजचे फर्निचर, सीसीटीव्ही संपूर्ण सेट, गॅरेजमधील स्पेअर्स पार्ट जळाल्याने सुमारे सहा ते सात लाखांचे नुकसान झाले आहे.

 

शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र आगीचे स्पष्ट कारण समजू शकले नाही. या आग वर्दीवर प्राधिकरण उप-अग्निशमन केंद्रातून उप अग्निशामक अधिकारी गौतम इंगोले, प्रमुख अग्निशामक विमोचक संपत गौंड, संजय महाडिक, वाहन चालक राजेश साखरे, अग्निशामक विमोचक अनिल माने, ट्रेनि फायरमन मयूर सुक्रे, निरंजन लोखंडे, थेरगाव उप अग्निशमन केंद्रातून प्रमुख अग्निशामक विमोचक हनुमंत होले, यंत्रचालक सरोश फुंडे, वाहन चालक मारुती गुजर, ट्रेनि सब ऑफिसर गणेश भोसले, ट्रेनि फायरमन कृष्णा सांगळे, संदीप धनसावंत तसेच पिंपरी मुख्य अग्निशमन केंद्रातून प्रमुख अग्निशामक विमोचक सारंग मंगरुळकर, यंत्रचालक रुपेश जाधव, ट्रेनी फायरमन प्रतीक खांडके, संदीप डांगे, शुभम शिरसागर, अश्विन पाटील आदी उपस्थित ( Ravet ) होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.