Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शस्त्र बाळगण्याबाबत निर्बंध लागू

एमपीसी न्यूज – भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीचा (Loksabha Election 2024 ) कार्यक्रम जाहीर केला आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात बाळगण्याबाबत निर्बंध लागू करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 तसेच शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 17(3)(ए) व (बी) अन्वये निर्बंध लागू केले आहेत.

पोटनिवडणूक सुरळीत, शांततेत व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी तसेच निवडणूक काळात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. हे निर्बंध 6 जूनपर्यंत राहणार आहेत. या कालावधीत नागरिकांना स्वत:जवळ परवानाप्राप्त अग्नीशस्त्रे, हत्यारे, दारुगोळा बाळगण्यास व बरोबर नेण्यास मनाई करण्यात आली आहे.

यांना असेल शस्त्र वापरण्यासाठी मुभा (Loksabha Election 2024)

या आदेशातून बंदोबस्तासाठी असणारे अधिकारी, कर्मचारी तसेच बँका व सार्वजनिक मालमत्तेच्या सुरक्षिततेसाठी नेमण्यात आलेले सुरक्षा कर्मचारी यांना वगळण्यात आले आहे. बँका अथवा सार्वजनिक संस्था यांच्यावर निवडणूक कालावधीत त्यांच्याकडील हत्यारांचा गैरवापर होणार नाही याची जबाबदारी (Loksabha Election 2024 ) राहील.

तर होणार कारवाई

या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय दंड विधान कायदा कलम 188 अन्वये शिक्षेस पात्र राहील, असेही जिल्हाधिकारी यांनी जारी केलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.