Pune : काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त सायकल रॅली

एमपीसी न्यूज – अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या138 व्या वर्धापन दिनानिमित्त ( Pune ) पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सायकल रॅली काढण्यात आली. ही रॅली रविवारी सकाळी देशभक्त केशवराव जेधे पुतळा, स्वारगेट ते काँग्रेस भवन पर्यंत  काढण्यात आली. यावेळी पुणे शहरातील महापुरूषांच्या पुतळ्यांसमोर रांगोळी काढून त्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 
या सायकल रॅलीमध्य महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, दिप्ती चवधरी, सिमा सावंत, सतिश पवार, भरत सुराणा, रवि ननावरे, हेमंत राजभोज, विशाल जाधव, रमेश सोनकांबळे, शिलार रतनगिरी, अरूण कटारिया, अनुसया गायकवाड, योगिता सुराणा, शारदा वीर, आशितोष शिंदे, राज घेलोत, नरसिंह आंदोली आदींसह काँग्रेस कार्येकर्ते सहभागी झाले होते.
दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी काँग्रेसने जोरदार केली आहे. त्या पार्श्वभूमीवर शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. पुणे लोकसभा निवडणुकीसाठी शिंदे स्वतः इच्छुक आहेत. या निवडणुकीत पक्ष ब्राह्मण उमेदवार देणार की मराठा याकडे लक्ष लागले आहे. प्रदेश सरचिटणीस ऍड. अभय छाजेड, माजी आमदार मोहन जोशी, प्रवक्ते गोपाळ तिवारी यांच्याही नावाची चर्चा आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपुरात काँग्रेसने जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. दिनांक 28 डिसेंबर हा काँगसचा वर्धापन दिन आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. 2024 च्या निवडणुकीत काँग्रेस इंडिया आघाडी म्हणून लढणार आहे. त्यासाठी काँग्रेसने मोदी सरकार विरोधात ( Pune ) सुमारे 28 पक्ष एकत्रित केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.