Dapodi : फुगेवाडीच्या माध्यमिक विद्यालयात भरला माजी विद्यार्थ्यांचा वर्ग

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या फुगेवाडी येथील (Dapodi) माध्यमिक विद्यालयात 25 वर्षानंतर माजी विद्यार्थ्यांचा वर्ग भरला. सन 1997-98 या बॅचचा माजी विद्यार्थी, शिक्षक स्नेहमेळावा संपन्न झाला. यावेळी सुमारे 40 माजी विद्यार्थ्यांनी स्नेहमेळाव्याला हजेरी लावली.

शाळेच्या उपमुख्याध्यापिका रोहिणी इनामदार, शिक्षक विठ्ठल एकशिंगे, सतीश पाटील, मधुकर भिसे, सुरेखा पाटील, अनिता बगाटे, नयना काकडे तसेच विद्यालयाचे शिक्षकेतर कर्मचारी लक्ष्मी फंड, समिंद्रा नाणेकर, विजया पोंगडे, सुरक्षारक्षक चंद्रकांत राऊळ आदि यावेळी उपस्थित होते.

Pune : जी-20 च्या प्रतिनिधींनी जाणून घेतला पुण्याचा इतिहास

25 वर्षानंतर एकमेकांना भेटलेल्या मित्रांचा आनंद ओसंडून वाहत होता. ही भेट आणि या आठवणी पुढील आयुष्यभर प्रेरणा आणि उत्साह देत राहतील, असे आपल्या मनोगतात सांगितले. माजी विद्यार्थ्याच्या हस्ते सर्व शिक्षकांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा उपमुख्याध्यापिका रोहिणी इनामदार यांनी सर्व माजी विद्यार्थ्यांना ‘तू दुसऱ्यांच्या वाटेतील मार्गदर्शक व्हा’ असा मोलाचा सल्ला दिला.

प्रमोद गोलांडे, विशाल सोनवणे, सविता फंड या माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. स्नेहमेळाव्याचे नियोजन विद्यालयाचे माजी विद्यार्थी तुषार फुगे, संदीप बांबे, संजय सिंग, राहुल गायकवाड, प्रशांत देवकर, निलेश दहीवाळ, प्रविण हरिहर, दीपक इंगळे, कमल तुपे, कविता जाधव, शितल वहिले, आशा गावडे यांनी (Dapodi) केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.