Dighi : सोसायटीच्या पार्किंग मधील वाहनांना आग

एमपीसी न्यूज – सोसायटीच्या पार्किंगमध्ये पार्क केलेल्या वाहनांना अज्ञातांनी आग लावली ही घटना (Dighi)  रविवारी (दि. 9) पहाटे सावंत नगर, दिघी येथे घडली. यामध्ये चार वाहने जळून खाक झाली आहेत. तर तिघेजण जखमी झाले आहेत.

सावंत नगर दिघी येथील ओम अपार्टमेंट मध्ये रस्त्याकडील बाजूला सोसायटीच्या पार्किंग मध्ये चार दुचाकी वाहने पार्क केली होती. रात्रीच्या वेळी अज्ञातांनी कपडा पेटवून दुचाकीच्या टायर जवळ लाकडाने ढकलला. त्यामुळे एका दुचाकीने पेट घेतला. ही आग जवळच असलेल्या अन्य तीन दुचाकी वाहनांना लागली. आगीचे लोट आणि मोठ्या प्रमाणात धूर झाला.

Pune : श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती आता ऐतिहासिक स्थळ

पार्किंगमध्ये आग लागल्याने धूर घरांमध्ये जाऊ लागला. त्यामुळे घरातील नागरिक बाहेर आले. त्यांनी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. मात्र जिन्याच्या समोरील बाजूस आग लागली होती. त्यामुळे नागरिकांनी इमारतीच्या छतावर जाण्याचा निर्णय घेतला. मात्र छतावर जात असताना त्यांना धुरामुळे रस्ता दिसत नव्हता. नागरिकांनी जिन्यातील रेलिंगला पकडून वर जाण्याचा प्रयत्न केला. मात्र रेलिंग देखील मोठ्या प्रमाणात गरम झाल्याने तिघेजण जखमी झाले आहेत.

घटनेची माहिती मिळताच भोसरी अग्निशमन उपविभागाचा बंब घटनास्थळी दाखल झाला. तत्पूर्वी परिसरातील नागरिकांनी वाहनांवरपाणी मारून आग आटोक्यात आणली होती. प्रकाश संग्राम वाघन्ना (वय 48) आणि अन्य दोघे जखमी झाले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.