Mahalunge : दारू पिऊन दुचाकी चालवणे बेतले भावाच्या जीवावर, अपघातात तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज- दारू पिऊन दुचाकीवरून आपल्या भावाला घेऊन जात असताना झालेल्या अपघातात भावाचा मृत्यू झाला आहे. ही घटना 2 एप्रिल 2023 रोजी येवलेवाडी खेड येथे घडली. मृत्यूनंतर परस्पर मृतदेहाची विल्हेवाट लावल्याप्रकरणी महाळुंगे (Mahalunge) एमआयडीसी पोलिसांनी गुरुवारी (दि.14) गुन्हा दाखल केला आहे.

Wakad : देशी बनावटीच्या पिस्तुलासह तरुणाला अटक

याप्रकरणी पोलिसांनी मारुती सुधाकर निंबाळकर (वय 34 रा येवलेवाडी खेड) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपी हा दारू पिऊन दुचाकीवरून आपल्या तीस वर्षीय भावाला घेऊन जात होता. यावेळी जात असताना त्याचे दुचाकी वरील नियंत्रण सुटले होते. यात दोघे घसरून रस्त्यावर पडले यामध्ये आरोपीच्या भावाच्या डोक्याला लागल्याने तो जागीच बेशुद्ध पडला. त्याला तातडीने खाजगी रुग्णालयात हलवले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

ही घटना एप्रिल मध्ये घडली असली तरी या प्रकरणी पोलिसांना कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. शिवाय परस्पर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली. यावरून महाळुंगे (Mahalunge) एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.