Chinchwad : ऑटोमोबाईल स्पेअर पार्ट बनवणाऱ्या कंपनीला आग; सुमारे एक कोटींचे नुकसान

एमपीसी न्यूज – वाल्हेकरवाडी चिंचवड (Chinchwad) येथील ऑटोमोबाईल स्पेअर पार्ट बनवणाऱ्या कंपनीला आग लागली. ही घटना गुरुवारी (दि. 14) रात्री घडली. या आगीत कंपनीतील साहित्य जळून खाक झाले असून यामध्ये सुमारे एक कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, काटे मळा चिंचवडेनगर, वाल्हेकरवाडी येथे एका कंपनीला आग लागल्याची वर्दी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास पिंपरी-चिंचवड अग्निशमन विभागाला मिळाली. आग मोठ्या स्वरुपात असल्याचे समजल्याने प्राधिकरण, पिंपरी, रहाटणी, थेरगाव, चिखली, भोसरी, तळवडे, बजाज ऑटो आकुर्डी, एमआयडीसी हिंजवडी फेज एक, पीएमआरडीए मारुंजी, टाटा मोटर्स इत्यादी ठिकाणावरून अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले.

Wakad : देशी बनावटीच्या पिस्तुलासह तरुणाला अटक

काही तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. जेसीबीच्या सहाय्याने गोडाऊन मधील मटेरियल बाजूला करून कुलिंग करत आग पूर्णपणे विझवण्यात आली. सुमारे 65 जवानांनी ही आग विझवण्यासाठी प्रयत्न केले.

गोडाऊन मधील ऑटोमोबाईल स्पेअर पार्ट, लोखंडी (Chinchwad) मटेरियल, प्लास्टिक मटेरियल, रबर, लाकडी रॅक, संगणक, लॅपटॉप, प्रिंटर, इलेक्ट्रिक वायर, बोर्ड, पत्रे आदि साहित्य जळून सुमारे एक कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.