Pune : पुणे ग्रामीण पोलिसांच्या पेट्रोल पंपावरील निधीचा गैरवापर केल्याप्रकरणी 56 कर्मचाऱ्यांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – पुणे (Pune)  ग्रामीण पोलिसांनी कल्याण मंडळाच्या अंतर्गत ग्रामीण पोलिसांमार्फत चालवल्या जाणाऱ्या पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या 56 कर्मचाऱ्यांवर जून 2021 पासून 2023 पर्यंत 20 लाख रुपयांच्या निधीचा गैरवापर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Chinchwad : ऑटोमोबाईल स्पेअर पार्ट बनवणाऱ्या कंपनीला आग; सुमारे एक कोटींचे नुकसान

नुकत्याच झालेल्या ऑडिटमध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली. पोलिसांकडे गेल्या दोन वर्षांत पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या इंधन कर्मचाऱ्य़ांची नावे दिली आहेत. आरोपींनी ग्राहकांकडून जमा केलेली रक्कम पुणे ग्रामीण पोलीस कल्याण मंडळाच्या खात्यात जमा केली नसल्याचे समोर आले आहे. याशिवाय, काही आरोपींनी त्यांच्या खाजगी खात्यांवरील UPI द्वारे केलेले पेमेंट वळवले आहे. याप्रकरणी चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे ग्रामीण पोलिसांनी बाणेर रोड आणि पाषाण रोडवरील दोन पेट्रोल पंपांचे उद्घाटन केले होते जे ग्रामीण पोलिसांच्या कल्याण मंडळामार्फत चालवले जात होते.या इंधन पंपांमधून मिळणारा महसूल पोलिसांच्या विविध उपक्रमांसाठी वापरला जात होता. या इंधन पंपाचे उद्घाटन तत्कालीन गृहराज्यमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते शहरात एका कार्यक्रमात करण्यात आले होते.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाणेर रोड पेट्रोल पंपाच्या खात्यात एकूण 17 लाख 25 हजार 324 रुपयांची तफावत आढळून आली, तर पाषाण रोड पेट्रोल पंपाच्या खात्यात 2 लाख 93 हजार 736 रुपयांची तफावत आढळून आली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.