Pune : पुणे शहराजवळ तब्बल 9000 लिटर दारू जप्त ; दारूचा अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई

एमपीसी न्यूज – पुणे ग्रामीण पोलिसांनी पुन्हा एकदा शहराजवळ ( Pune) एक मोठी कामगिरी केली आहे. यावेळी दारूची अवैध व्यवसायावर करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. ड्रग्स प्रकरणानंतर आता अवैध मद्य विक्रीवर पोलिसांची करडी नजर आहे. यावेळी पुणे शहराजवळ तब्बल 9000  लिटर दारू जप्त केली आहे. 

Baner : रन फॉर अमृतकाल स्पर्धेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

उरुळी कांचन पोलीसांनी  पुणे शहराजवळ सोरतापवाडी जवळ पोलीसांनी हातभट्टीवर मोठा छापा टाकून जवळपास नऊ हजार लिटर हातभट्टी दारू जप्त केली आहे.

सोरतापवाडी भागात पोलिसांनी 2 ठिकाणी कारवाई केली आहे. यावेळी एका कारवाईत पोलिसांनी 525 लिटर दारू जप्त केली आहे. तर दुसऱ्या कारवाईत 9000 लिटर हातभट्टी दारूचं कंटेनर जप्त केले आहेत. पोलिसांनी याच ठिकाणी छापेमारी करत दारू तयार करण्यासाठी लागणारे 5000 लिटर रसायन जप्त केले ( Pune) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.