Lonavala : पुणे ग्रामीण पोलिसांच्या ‘वारसा स्वच्छतेचा मावळा शिवरायांचा’ या अभियानाच्या दुसऱ्या पर्वाची घोषणा

एमपीसी न्यूज – पुणे ग्रामीण पोलिसांनी ‘वारसा स्वच्छतेचा मावळा शिवरायांचा’ हे स्वच्छता ( Lonavala) अभियान सुरु केले आहे. एप्रिल 2023 मध्ये या अभियानाचे पहिले पर्व पार पडले. आता या अभियानाच्या दुसऱ्या पर्वाची घोषणा करण्यात आली आहे. दुसऱ्या पर्वात लोणावळा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि नांगरगाव लोणावळा येथील सोमनाथ महादेव मंदिर इंद्रायणी नदी पात्र येथे हे स्वच्छता अभियान राबवले जाणार असल्याची माहिती सहायक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी दिली.

पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी, सहायक पोलीस अधीक्षक यांच्या संकल्पनेतून ‘वारसा स्वच्छतेचा मावळा शिवरायांचा’ हे गड किल्ले स्वच्छता अभियान एप्रिल 2023 पासून सुरु करण्यात आले आहे.

26 एप्रिल 2023 रोजी मावळ तालुक्यातील कार्ला येथील ऐतिहासिक एकविरा गड व बौद्ध कालीन लेण्यांची स्वछता करून या अभियानाची सुरुवात करण्यात आली. या अभियानात पोलीस अधिकारी, अंमलदार यांच्यासह महाविद्यालयीन विद्यार्थी, एनसीसी कॅडेड, सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ, वकील, पत्रकार, पोलीस पाटील व नागरिकांनी सहभाग घेतला. या अभियानास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Chikhali : चिखली रामायण मैदानात होणार भजन महोत्सवाचा ‘निनाद’

अभियानामध्ये किल्ले लोहगड, तसेच पर्यटकांच्या पहिल्या पसंतीचे लोणावळ्यातील लोकप्रिय पर्यटन स्थळ असलेले टायगर पॉईंट, भुशी डॅम व किल्ले तिकोना या ठिकाणाची स्वछता करण्यात आली. अभियानात 12 टन कचऱ्याचे संकलन करून हा कचरा लोणावळा नगरपरिषदेच्या कचरा प्रक्रिया केंद्रास सुपूर्त करण्यात आला होता.

या अभियानाच्या माध्यमातून प्लास्टिक पिशव्या, रिकाम्या प्लास्टिक बाटल्या, दारूच्या ( Lonavala) रिकाम्या काचेच्या बाटल्या व इतर कचरा संकलित करण्यात आला. या स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून लोकांमध्ये विविध विषयावर जनजागृती करण्यासाठी स्वछता अभियान संपल्यानंतर उपस्थितांना पथनाट्य तसेच तज्ञ व्यक्तींकडून व्यसनमुक्ती, सायबर सुरक्षा, महिला सुरक्षा, वाहतूक नियमन या सारख्या विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

स्वच्छता अभियानाचे दुसरे पर्व

या स्वछता अभियानाच्या दुसऱ्या पर्वाची सुरुवात शनिवारी (दि. 20 जानेवारी 2024) सकाळी साडेसहा पासून लोणावळा येथून होणार आहे. लोणावळा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील सर्व महापुरुषांचे पुतळे व परिसराची स्वछता केली जाणार आहे. सोमनाथ महादेव मंदिर नांगरगाव, लोणावळा येथील इंद्रायणी नदी पत्रातील जलपर्णी काढण्याचे काम देखील केले जाणार आहे. स्वयंसेवकांची दोन गटात विभागणी करून दोन्ही ठिकाणी स्वच्छता केली जाईल. या अभियानात सर्व नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन सत्यसाई कार्तिक ( Lonavala)  यांनी केले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.