Alandi : इंद्रायणी जलप्रदूषण मुक्तीसाठीचे बेमुदत उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरूच

hird day

एमपीसी न्यूज – आळंदी येथे राष्ट्रवादी अध्यात्मिक व वारकरी ( Alandi) आघाडी महाराष्ट्र यांच्या वतीने  दि.15 पासून इंद्रायणी प्रदूषण मुक्तीसाठीचे बेमुदत उपोषण सुरू केले आहे. आज या उपोषणाचा तिसरा दिवस सुरू आहे. महाद्वार चौकात  ह भ प मोहनानंद महाराज ओवाळ, ह भ प मुबारकभाई शेख, फारूक इनामदार, ह भ प दत्तात्रय साबळे यांचे हे बेमुदत उपोषण चालू आहे.

 

आज इंद्रायणी सेवा फाउंडेशने या उपोषणास पाठींबा देऊन उपोषण कर्त्यांच्या तब्येतेची चौकशी केली. तसेच आज (दि.17 रोजी) सुद्धा
इंद्रायणी नदी जलप्रदूषणा मुळे फेसाळलेलीच होती. इंद्रायणी नदीपात्रातील पाणी काळे झाले असून तिला गटाराचे  स्वरूप प्राप्त ( Alandi) झाले आहे.
https://www.youtube.com/watch?v=PgIBWVfvvUw&t=123s

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.