Chakan : किरकोळ कारणावरून तरुणाला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज – शिवीगाळ कऱणाऱ्याला हटकले म्हणून रॉडने (Chakan) मारहाण करत तरुणाला गंभीर जखमी केले आहे. ही घटना सोमवारी (दि.15) चाकण येथे घडली. 

Alandi : इंद्रायणी जलप्रदूषण मुक्तीसाठीचे बेमुदत उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरूच

याप्रकरणी मयूर रामदास दराडे (वय 19 रा. आंबेठाण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून पोलिसांनी आदेश बोरकर याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या भावाला आरोपी हा शिवीगाळ करत होता. यावेळी फिर्यादी यांनी त्याला हटकले. याचा राग येऊन आरोपीने अल्युमिनीयम रॉडने छातीत व डोक्यात मारून गंभीर जखमी केले.

यात डोक्याला कोट पडून फिर्यादी गंभीर जखमी झाले. फिर्यादीचा मित्र अभिषेक सुर्यवंशी याला देखील आरोपीने मारहाण केली. यावरून चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत (Chakan) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.