Mahalunge : बॅटरी शॉपमधून दोन लाखांच्या बॅटरी चोरीला

एमपीसी न्यूज – खिडकीची जाळी काढून (Mahalunge)  शॉपमधून 2 लाख रुपयांच्या 32  बॅटरी चोरून नेल्या आहेत. ही चोरी 8 ते 9 जानेवारी रोजी महाळुंगे येथे सुर्या बॅटरी सेल्स अँड सर्व्हीस येथे घडली आहे.

Chakan : किरकोळ कारणावरून तरुणाला बेदम मारहाण

याप्रकरणी मुकेश बबन आगवणे (वय 39 रा.चाकण) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून अज्ञात इसमावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या शॉपच्या मागील बाजूच्या भींतीची खिडकीची जाळी तोडून चोरांनी शॉपमध्ये प्रवेश केला. त्यांनी वेगवगेळ्या कंपनीच्या  2 लाख 135 रुपयांच्या 32 बॅटरी चोरून नेल्या आहेत. चोरीचा प्रकार उघडकीस येताच फिर्यादी यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलीस चोरांचा शोध घेत (Mahalunge) आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.