Chinchwad : एक वर्षासाठी तडीपार केलेल्या दोघांची तडीपारी रद्द

एमपीसी न्यूज – जमिनी तसेच सदनिकांवर अनधिकृतपणे (Chinchwad)ताबा मारून खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देत धुमाकूळ घालण्याचा आरोप करत दाखल असलेल्या गुन्ह्यांवरून पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून एका महिलेसह दोघांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली होती.

 

या कारवाई विरोधात दोघांनी विभागीय आयुक्त तथा अपिलीय प्राधिकारी यांच्या न्यायालयात धाव घेतली असता विभागीय आयुक्तांनी तडीपारी रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.

भारती निंबा भारंबे (वय 55) आणि मल्लिनाथ भीमाशंकर (Chinchwad)नोल्ला (वय 60, दोघे रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांच्या विरोधात केलेली तडीपारीची कारवाई रद्द करण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड परिमंडळ एकचे तत्कालीन पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी 21 ऑक्टोबर 2023 रोजी भारंबे आणि नोल्ला यांना पुणे जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार करण्याचे आदेश दिले होते. त्या आदेशाच्या विरोधात दोघांनी 25 ऑक्टोबर 2023 रोजी विभागीय आयुक्त तथा अपिलीय प्राधिकारी यांच्या न्यायालयात अर्ज दाखल केला होता.

भारती भारंबे यांच्या विरोधात सन 2020 मध्ये चिंचवड पोलीस ठाण्यात प्रादेशिक नगररचना अधिनियमान्वये तीन गुन्हे दाखल आहेत. त्यासह लोणावळा पोलीस ठाण्यात सन 2021 मध्ये फसवणुकीचा एक तर सन 2022 मध्ये चिंचवड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा एक असे एकूण सहा गुन्हे दाखल आहेत. हे सर्व गुन्हे न्यायप्रविष्ठ असून त्यामध्ये त्यांना अटकपूर्व जामीन देखील मिळाला आहे.

तर नोल्ला यांच्या विरोधात लोणावळा पोलीस ठाण्यात सन 2021 आणि चिंचवड पोलीस ठाण्यात सन 2022 मध्ये फसवणुकीचे प्रत्येक एक गुन्हे दाखल आहेत. भारंबे आणि नोल्ला यांच्या विरोधात दाखल असलेले सर्व गुन्हे दोन खासगी व्यक्तीने दाखल केलेले आहेत. भारंबे आणि नोल्ला यांनी कोणतीही टोळी तयार केली नसून कोणत्याही गुन्हेगारी टोळीचे प्रमुख अथवा सदस्य नाहीत.

Mahalunge : बॅटरी शॉपमधून दोन लाखांच्या बॅटरी चोरीला

 

दोघांवर तडीपारीची कारवाई करणे हे बेकायदेशीर राहील, असे निरीक्षण नोंदवत तडीपारीचा आदेश संपुष्टात आणण्याचे आदेश दिले आहेत.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.