Punawale: शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकीचे आमिष दाखवून

एमपीसी न्यूज – एअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सागून (Punawale)ते शेअर विकत फिर्यादीची तब्बल 26 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. ही फसवणूक 18 नोव्हेंबर 2023 ते 16 जानेवारी 2024 या कालावधीत पुनावळे येथे ऑनलाईन पद्धतीने घडली.

याप्रकरणी आशिष श्यामसुंदर कुलकर्णी (वय 39 रा.पुनावळे) यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून पोलिसांनी अनिल शर्मा, आशिष शहा यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Chinchwad : एक वर्षासाठी तडीपार केलेल्या दोघांची तडीपारी रद्द

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी यांना फ्रन्टलाईन के-04 या (Punawale)व्हटसअपग्रुपवर फिर्यांदी यांना शेअर मार्केटची माहिती पाठवून त्यांचा विश्वास संपादन करून त्यांना परताव्याचे आमिष दाखविण्यात आले. आरोपींनी CHC-SFS या अपवरून 26 लाख 12 हजार रुपयांचे शेअर खऱेदी करायला लावले.

 

पुढे त्यांनी ते शेअर विकून  फिर्यादीला ती रक्कम न देता परस्पर स्वतःच्या खात्यावर घेत फिर्यादी यांची 26 लाख 12 हजार रुपयांची फसवणूक केली. यावरून रावेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाल केला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.