Pune : रविवारी सादर होणार गीत रामायणावर आधारित नृत्याविष्कार

एमपीसी न्यूज – अयोध्या येथील श्री राम प्राणप्रतिष्ठेच्या ( Pune) पूर्वसंध्येला रविवारी (दि. 21) गीत रामायणावर आधारित काही निवडक गीतांवर नृत्याविष्काराचा कार्यक्रम होणार आहे. शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्था, मित्र फाऊंडेशन आणि अलाईव्ह कल्चरल्स यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

Chinchwad : एक वर्षासाठी तडीपार केलेल्या दोघांची तडीपारी रद्द

कलावर्धिनी, मनिषा नृत्यालय, आकृती नृत्यालय, कलाश्री नृत्यालय, कथक पाठशाला, स्वरदा नृत्यालय, नृत्यप्रेरणा, कलानुभूती, नृत्यभारती, समर्चना, सूक्ष्मी कथक स्टुडीओ, रूपक नृत्यालय या संस्था सादरीकरण करणार आहेत.  स्व. ग. दि. माडगूळकर लिखित, सुधीर फडके यांचे संगीत असलेल्या गीत रामायणावर आधारित हा विशेष नृत्य सादरीकरण कार्यक्रम आहे. कार्यक्रमाची संकल्पना अजय धोंगडे यांची असून निवेदन नीरजा आपटे यांचे आहे. रविवारी सायंकाळी सहा वाजता केशवबाग, डी पी रोड, राजाराम पुलाजवळ, कर्वेनगर येथे हा कार्यक्रम होणार आहे.

हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे. मात्र प्रवेशिका असणे आवश्यक आहे. या प्रवेशिका हॉटेल व्हरांडा (मेहेंदळे गॅरेज) ,अग्रज फूड (ताथवडे उद्यानाशेजारी, कर्वेनगर) येथे उपलब्ध ( Pune) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.