Pune : लॉयला, विद्या व्हॅली प्रशालेचे सहज विजय

लॉयला कप फुटबॉल

एमपीसी न्यूज  – टाटा ऑटोकॉम्प आंतरशालेय लॉयल कप फुटबॉल स्पर्धेच्या दहाव्या दिवशी सोमवारी यजमान लॉयला आणि विद्या व्हॅली प्रशाला संघांनी आपली आगेकूच कायम राखली.

Dehuroad : नागरिकांचे मोबाईल हिसकावणाऱ्या दोघांना अटक; 19 मोबाईल, पाच रिक्षा जप्त

लॉयला प्रशालेच्या मैदानावर (Pune) सोमवारी झालेल्या सामन्यात लॉयला प्रशालेने पीआयसीटी मॉडेल स्कूलवर दोन गटात विजय मिळविले, तर विद्या व्हॅलीने तीनही गटात सेंट पेट्रिक्स प्रशालेवर विजय मिळविला.

 

१६ वर्षांखालील गटात लॉयला प्रशालेने ८-२ असा विजय मिळविला. वेदांत गुप्ता आणि वेदांत कांबळे यांनी प्रत्येकी तीन गोल नोंदवले. अथर्व सोनावणे आणि लव्या असरानीने अन्य गोल केले. पीआयसीटीकडून दोन्ही गोल अन्मय सिंगने केले.

 

आर्यवर्धन काकडेने (१३, २२वे मिनिट) नोंदवलेल्या दोन गोलच्या जोरावर लॉयला प्रशालेने १४ वर्षांखालील गटात ३-० असा विजय मिळविला. तिसरा गोल आदिराज सिंगने ४१व्या मिनिटाला केला.

 

विद्या व्हॅली प्रशालेने प्रथम १६ वर्षांखालील गटात सेंट पेट्रिक्सवर ६-० असा विजय मिळविला. निमेश पाठकने तीन, तर शौनक चौटाने दोन  आणि अथर्व सिंगने एक गोल केला.

 

विद्या व्हॅली प्रशाला संघाने १४ वर्षांखालील गटात ५-२ आणि १२ वर्षांखालील गटात ६-० असा विजय मिळवून सेंट पेट्रिक्स प्रशाला संघाला निष्प्रभ केले.

 

निकाल –

१४ वर्षांखालील – लॉयला प्रशाला ३ (आर्यवर्धन काकडे १३वे, २२वे मिनिट, आदिराज सिंग ४१वे मिनिट) वि.वि. पीआयसीटी मॉड़ेल स्कूल ०

 

विद्या व्हॅली प्रशाला ६ (शौर्य मेहता ५वे, ३३वे मिनिट, रिषर जोशी ११वे, ३२वे मिनिट, मल्हार देशमुख २७वे मिनिट, सुवान गोष ४०वे मिनिट) वि.वि. सेंट पेट्रिक्स प्रशाला ०

 

१६ वर्षांखालील – लॉयला प्रशाला ८ (वेदांत गुप्ता ७, २१, २३वे मिनिट, वेदांत कांबळे २२, ३८, ५३वे मिनिट, अथर्व सोनावणे २९वे मिनिट, लव्या असरानी ४२वे मिनिट) वि.वि. पीआयसीटी मॉडेल स्कूल २ (अन्मय सिंग ६, ११वे मिनिट)

 

विद्या व्हॅली प्रशाला ६ (निमेश पाठक ९वे, २०, ४६वे मिनिट, शौनक चौटा १९, ५४वे मिनिट, अथर्व सिंग २७वे मिनिट) वि. वि. सेंट पेट्रिक्स प्रशाला ०

 

१२ वर्षांखालील – विद्या व्हॅली प्रशाला ६ (शौर्य मेहता ५, ३३वे मिनिट, रिषर जोशी ११, २३वे मिनिट, मल्हार देशमुख २७वे मिनिट, सुवान घोष ४०वे मिनिट) वि.वि. सेंट पेट्रिक्स प्रशाला ०

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.