Dehuroad : नागरिकांचे मोबाईल हिसकावणाऱ्या दोघांना अटक; 19 मोबाईल, पाच रिक्षा जप्त

एमपीसी न्यूज – नागरिकांच्या हातातील मोबाइल हिसकावणाऱ्या दोघांना अटक करत त्यांच्या दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले. चौघांकडून 19 मोबाईल फोन आणि पाच रिक्षा असा 8 लाख 86 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Pune : येलमार समाज प्रतिष्ठाणच्या अध्यक्षपदी अमोल माडगूळकर

नागेश बाळू भंडारी व तरुणी (दोघेही रा. म्हातोबानगर, वाकड) यांना अटक केली आहे.

साईनगर, देहूरोड (Dehuroad) येथे रिक्षातून आलेल्या चार जणांच्या टोळक्यााने बसची वाट पाहात थांबलेल्या प्रवाशाचा मोबाइल हिसकावून नेला. याप्रकरणी आरोपी नागेश बाळू भंडारी व तरुणी यांना पोलिसांनी अटक केली. तसेच त्यांच्या दोन अल्पवयीन साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

आरोपींना विश्वाकसात घेऊन चौकशी केली असता त्यांनी 20 जुलै रोजी पुनावळे येथे एकाचा मोबाइल हिसकावल्याचे सांगितले. तसेच थेरगाव वाकड, सांगवी, पिंपरी परिसरातून आणखी चार रिक्षा तसेच पिंपरी चिंचवड परिसरातून चोरलेले आणखी 18 मोबाइल हस्तगत केले.

आरोपींकडून पाच रिक्षा व 19 मोबाइल असा एकूण आठ लाख 86 हजारांचा ऐवज हस्तगत केला आहे. देहूरोड, पिंपरी व रावेत पोलीस स्टेशनचे प्रत्येकी एक तसेच सांगवी व वाकड पोलीस स्टेशनचे प्रत्येकी दोन असे एकुण सात गुन्हे उघडकीस आले आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह आयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर आयुक्त वसंत परदेशी, उपायुक्त काकासाहेब डोळे, सहाय्यक आयुक्त पद्याकर घनवट, पोलीस निरीक्षक दिगंबर सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरिक्षक संजय ढमाळ, पोलीस अंमलदार प्रशांत पवार, बाळासाहेब विधाते, सुनिल यादव, किशोर परदेशी, प्रशांत माळी, केतन कानगुडे. निलेश जाधव, युवराज माने, सचिन शेजाळ, स्वप्नील साबळे, शुभम बावनकर, संतोष महाडीक, कैलास शिंदे, सागर कळमकर, संतोष भराट, सुनिता पटेकर, दिपाली शिंदे यांच्या पथकाने केली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.