Crime News : वाकड येथून वेश्याव्यवसाय प्रकरणी दोघांना अटक

एमपीसी न्यूज – वाकड येथील रांजना लॉजमध्ये कारवाई करत वेश्याव्यवसाय प्रकरणी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने दोघांना अटक केली आहे.ही कारवाई सोमवारी (दि.22) सायंकाळी करण्यात आली.

रॉनी बच्चालाल भारती (वय 21, रा. म्हाळुंगे, पुणे. मूळ रा. उत्तर प्रदेश), अमित उर्फ प्रवीण बळीराम असटकर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.याप्रकरणी पोलीस नाईक भगवंत चिंधू मुठे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड येथील रांजना लॉजमध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी प्रतिबंधक कक्षाला मिळाली.त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून दोघांना ताब्यात घेतले.आरोपींनी काही महिलांना पैशांचे आमिष दाखवून वेश्या व्यवसायासाठी प्राप्त केले होते. त्यांच्याकडून आरोपी वेश्या व्यवसाय करवून घेत असून त्यावर आपली उपजीविका भागवत असल्याचे तपासात समोर आले.आरोपींकडून 20 हजार 910 रुपयांचाऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.